VIDEO: कॉमेडियन सुनील ग्रोव्हर रस्त्यावर विकताना दिसला आर्टिफिशल दागिने, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 12:29 IST2022-09-17T12:29:17+5:302022-09-17T12:29:58+5:30

Sunil Grover : सुनील ग्रोव्हरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

VIDEO: Comedian Sunil Grover was seen selling artificial jewelery on the street, the video is going viral | VIDEO: कॉमेडियन सुनील ग्रोव्हर रस्त्यावर विकताना दिसला आर्टिफिशल दागिने, व्हिडीओ होतोय व्हायरल

VIDEO: कॉमेडियन सुनील ग्रोव्हर रस्त्यावर विकताना दिसला आर्टिफिशल दागिने, व्हिडीओ होतोय व्हायरल

सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) हा एक उत्तम अभिनेता तर आहेच, पण त्यापेक्षाही त्याची एक खासियत आहे ती म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणणे. सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर सक्रीय असून तो व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचे हे व्हिडीओ बऱ्याचदा चर्चेत येत असतात. दरम्यान आता कॉमेडियनने असाच आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो रस्त्याच्या कडेला एक दुकान उघडून बसला आहे, पण जेव्हा ग्राहक काही खरेदी करायला येतात, तेव्हा तो विकण्यास नकार देताना दिसतो आहे.

सुनील ग्रोव्हरने नुकताच एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात पाहायला मिळत आहे की, सुनील ग्रोव्हर रस्त्याच्या कडेला एका कृत्रिम दागिन्यांच्या दुकानासमोर बसलेला दिसत आहे. जणू तो त्याच दुकानाचा मालक आहे. तेव्हा कोणी त्याला कोणत्याही दागिन्यांचा दर विचारतो. तेव्हा तो दागिने विकण्यास नकार देतो आणि म्हणतो की हे माझे पर्सनल आहे. विक्रीसाठी नाही. 


सुनील ग्रोव्हर सध्या चित्रपटांमध्ये किंवा वेब सीरिजमध्ये दिसतो. कपिल शर्माच्या शोमध्ये तो कधी गुत्थी तर कधी डॉ. मशूर गुलाटीच्या भूमिकेत पाहायला मिळाला आणि त्याला खूप पसंती मिळाली. पण नंतर काही कारणांमुळे तो या शोपासून दूर गेला पण कॉमेडी त्याच्यापासून दूर गेली नाही. याच कारणामुळे सुनील ग्रोव्हर आजही सोशल मीडियाच्या माध्यमातून हशा पिकवताना दिसतो.

Web Title: VIDEO: Comedian Sunil Grover was seen selling artificial jewelery on the street, the video is going viral