वीणा जगतापची नवी मालिका, पण साइड रोलमुळे चाहते नाराज; म्हणाले- "तिला मुख्य भूमिका..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 13:03 IST2024-08-28T12:59:36+5:302024-08-28T13:03:52+5:30

नव्या मालिकेतून वीणा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

veena jagtap new zee marathi serial savlyachi sawali janu to play inportant role but fans dispointted | वीणा जगतापची नवी मालिका, पण साइड रोलमुळे चाहते नाराज; म्हणाले- "तिला मुख्य भूमिका..."

वीणा जगतापची नवी मालिका, पण साइड रोलमुळे चाहते नाराज; म्हणाले- "तिला मुख्य भूमिका..."

अभिनेत्री वीणा जगताप हा टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. कलर्स मराठी वाहिनीवरील या मालिकेत वीणा मुख्य भूमिकेत दिसली होती. या मालिकेने वीणाला प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेनंतर वीणा 'आई माझी काळुबाई' या मालिकेत दिसली होती. वीणाने 'बिग बॉस मराठी'चं घरही गाजवलं होतं. आता पुन्हा एकदा वीणा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. नव्या मालिकेतून वीणा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

वीणा जगतापचीझी मराठी वाहिनीवरील मालिकेत वर्णी लागली आहे. 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेतून वीणा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत वीणा महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'सावळ्याची जणू सावली' मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये वीणाची झलक पाहायला मिळत आहे. वीणाला पुन्हा नव्या भूमिकेत टीव्हीवर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. पण, वीणा या मालिकेत सहाय्यक भूमिका साकारत असल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


मालिकेच्या या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. "वीणा जास्त सुंदर दिसतेय. ती मेन हिरोईन हवी होती. तर मालिका पाहायला जास्त मजा आली असती", असं एका चाहत्याने म्हटलं आहे. "वीणाला साईड रोल का दिला आहे?" अशी कमेंटही केली आहे. "वीणाला मुख्य भूमिकेत ठेवा कारण तिचा चाहता वर्ग संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. वीणामुळे टीआरपी वाढायला मदत होईल", असंही एकाने म्हटलं आहे. 

दरम्यान, 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेता साईंकित कामत आणि अभिनेत्री प्राप्ती रेडकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सुलेखा तळवलकर, आशिष कुलकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: veena jagtap new zee marathi serial savlyachi sawali janu to play inportant role but fans dispointted