'वीण दोघातली ही तुटेना' उत्कंठावर्धक वळणावर, स्वानंदी-समरचा येणार समोरासमोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 18:36 IST2025-09-04T18:36:02+5:302025-09-04T18:36:33+5:30
'वीण दोघातली ही तुटेना' (Veen Doghatali Tutena Serial) मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

'वीण दोघातली ही तुटेना' उत्कंठावर्धक वळणावर, स्वानंदी-समरचा येणार समोरासमोर
झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' (Veen Doghatali Tutena Serial) मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. काही दिवसांपूर्वी समरने रागाच्या भरात स्वानंदीला अटक करण्याचा कट रचला, पण आनंदने तो थांबवण्याचा प्रयत्न केला. आता आजी स्वानंदीला समरच्या बंगल्यात आणते आणि तिथे दोघांचा अनपेक्षितपणे आमनासामना होताना दिसणार आहे.
समर आणि स्वानंदीच्या आधीच्या भेटी लक्षात घेता ते दोघे ही एकमेकाचे शत्रू आहेत, तरीही यावेळी दोघांनी शांतपणे वागण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, काही क्षणांतच पोलिस येऊन स्वानंदीला अटक करतात आणि संपूर्ण कुटुंबाला धक्का बसतो. अंशुमन कडक आदेश दितो की स्वानंदीला पुन्हा घरात पाऊल ठेवू द्यायचं नाही. पण समर आणि आनंद हुशारीने पोलिसांच्या पुढच्या कारवाईचा प्रसंग टाळायला बघतात. त्यानंतर समर स्वानंदीची माफी माघायला जातो आणि तक्रार मागे घेण्याचं आश्वासन दितो. मात्र सतत तणावामुळे स्वानंदी आजारी पडते आणि समर तिची काळजी घेतो.
दरम्यान, रोहनवर अधिराच्या श्रीमंतीचा दबाव वाढतो आहे. तो स्वतःचं आणि बहिणीचं लग्न एकाच वेळी शक्य नसल्याचं सांगतो त्यामुळे रोहन आणि अधिराच्या नात्याला नवी कलाटणी मिळते. दुसरीकडे, गुंड वृद्धाश्रमात येऊन अंजलीला मारहाण करतात. अधिरा रोहनची गरीबी समजूनही त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेत असल्याचं ठामपणे जाहीर करते. एकीकडे काकू आणि अंशुमन स्वानंदीच्या हेतूवर संशय घेत आहेत, तर दुसरीकडे काकू समरच्या मनात रोहनने घर जावई व्हावा असा विचार रोवते. मात्र अधिरा आपल्या निर्णयावर ठाम आहे. शेवटी समर आणि स्वानंदी दोघांनाही अधिरा–रोहनच्या लग्नासाठी एकत्र बसून बोलणं गरजेचं असल्याचं जाणवतं. अधिराच्या भवितव्याच्या दृष्टीने स्वानंदीशी थेट संवाद करायचं ठरतं. आता अधिरा रोहनच्या आनंदासाठी समर-स्वानंदीमध्ये एकी होणार की अजून नवीन वाद तयार होणार? हे पाहणे कमालीचे ठरेल.