'आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरची आगळीवेगळी वटपौर्णिमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 13:47 IST2021-06-23T13:35:40+5:302021-06-23T13:47:32+5:30
. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा झाला मात्र निराळ्या पद्धतीने. यानिमित्ताने प्रेक्षकांना देखील निसर्गाचं रक्षण करण्याचं आवाहन कलाकारांकडून करण्यात आलं.

'आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरची आगळीवेगळी वटपौर्णिमा
वरुणराजाचं आगमन झालं की तमाम स्त्रियांना आतुरता असते ती वटपौर्णिमा सणाची. वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा या सणाचा महत्त्वाचा उद्देश. हा सण आपल्याला निसर्गाच्या जवळ जायला भाग पाडतो. वडाचं झाड म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा करणारी निसर्गाची देणगीच. सध्याच्या घडीला आपल्या प्रत्येकालाच या ऑक्सिजनचं महत्त्व पटतं आहे.
त्यामुळेच वटपौर्णिमेच्या सणादिवशी वडाच्या झाडाच्या पुजनाला मोठं महत्त्व आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा झाला मात्र निराळ्या पद्धतीने. मालिकेच्या टीमने कुंडीतच वडाचं झाड लावून त्याची साग्रसंगीत पूजा केली. यानिमित्ताने प्रेक्षकांना देखील निसर्गाचं रक्षण करण्याचं आवाहन कलाकारांकडून करण्यात आलं.
‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या नात्यात तणाव असला तरी अनिरुद्धच्या निरोगी आयुष्यासाठी अरुंधती प्रार्थना करणार आहे. संजनासाठी अरुंधतीचं हे वागणं न पटणारं असलं तरी अरुंधती आपल्या मतावर ठाम असणार आहे.अरुंधती आपल्या कृतीतून नेहमीच नवा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असते.
त्यामुळे या वटपौर्णिमेच्या सणादिवशीही नवरा बायकोच्या नात्याचं खरं महत्त्व ती संजनाला पटवून देणार आहे. याशिवाय अंकिताचीही पहिलीच वटपौर्णिमा आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबात वटपौर्णिमेच्या सणाची लगबग पाहायला मिळेल.