वरूण शर्मा म्हणतोय 'कौन है?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 06:00 IST2018-08-24T16:24:38+5:302018-08-25T06:00:00+5:30
'कौन है?' मालिकेच्या या वीकेंडच्या एपिसोडमध्ये रक्षाबंधनचा शाप ही भीतीदायक कथा दाखविली जाणार आहे.

वरूण शर्मा म्हणतोय 'कौन है?'
कलर्स वाहिनीवरील हॉरर मालिका 'कौन है?'ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेने अमानवी घटनांच्या कथा सादर करून प्रेक्षकांना गुंतवून ठेवले आहे. आगामी भागात छोट्या पडद्यावरील चॉकलेट बॉय वरूण शर्मा दिसणार आहे. या वीकेंडच्या एपिसोडमध्ये रक्षाबंधनचा शाप ही भीतीदायक कथा दाखविली जाणार आहे. या भागात प्रेक्षकांचा थरकाप उडणार आहे.
'कौन है?'च्या रक्षाबंधन विशेष भागात राजस्थानमध्ये घडणाऱ्या या कथेतून एका गावातील कहाणी सांगितली आहे. ज्या गावात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यावर एका शापामुळे बंदी आहे. एक भाऊ-बहिण त्यांच्या मित्राच्या साखरपुड्याला त्या गावात येतात आणि रक्षाबंधन सण साजरा करणे बंद केले असताना हा सण साजरा करतात. अनपेक्षितपणे ही भावंडे शाप तोडतात आणि एका 150 वर्षांच्या रुदालीच्या भूताला मुक्त करतात.
कौन है? मालिकेतील भूमिकेविषयी बोलताना वरूण शर्मा म्हणाला, मला भुतांची अतिशय भीती वाटते आणि माझा अमानवी शक्तींवर विश्वास आहे. मी प्रथमच भयपटात काम करत आहे आणि कौन है? मध्ये काम करण्याचा माझा अनुभव समृद्ध करणारा आहे. कौन है?च्या चित्रीकरणानंतर मला अभिनेता म्हणून माझे मन बदलावे लागले आहे आणि विविध प्रकार करणे आवश्यक आहे. मला आनंद आहे की अशा प्रकारच्या भूमिका करण्याची संधी मला मिळाली ज्याचा मला अभिमान वाटेल.
भाऊ आणि बहिणीची रक्षा करण्याची ताकद राखी मध्ये असते का? त्यांची त्या आत्म्या पासून सुटका होईल का? हे पाहण्यासाठी 'कौन है?' ही मालिका पाहावी लागेल.