करिष्मा -जॅकलिनला वरूण धवन बोलतोय चलती है क्या 9 से 12

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 12:25 IST2018-12-05T12:22:22+5:302018-12-05T12:25:17+5:30

‘जुडवा’ या सलमान खान आणि करिष्मा कपूरच्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटाच्या पुढील भागात- ‘जुडवा-2’मध्ये वरूणने प्रमुख भूमिका साकारली होती.

Varun Dhawan shakes a leg with Karishma Kapoor and Jacquline Fernandes on ‘Tan Tana Tan’ | करिष्मा -जॅकलिनला वरूण धवन बोलतोय चलती है क्या 9 से 12

करिष्मा -जॅकलिनला वरूण धवन बोलतोय चलती है क्या 9 से 12

‘स्टार प्लस’वरील ‘लक्स गोल्डन रोझ पुरस्कारां’ची तिसरे सिझन नुकतेच मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात एकापेक्षा एक बहारदार कार्यक्रम सादर करून बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी उपस्थित प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले.या सोहळ्यात ‘टन टना टन टन टन तारा’  या लोकप्रिय गाण्यावर आजच्य तरूणांचा लाडका सुपरस्टार वरूण धवनने करिष्मा कपूर आणि जॅकेलिन फर्नांडिस या दोन वेगवेगळ्या सुपरस्टार तारकांबरोबर डान्स करत या पुरस्कास सोहळ्याची रंगत अधिकच वाढवली होती.

‘जुडवा’ या सलमान खान आणि करिष्मा कपूरच्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटाच्या पुढील भागात- ‘जुडवा-2’मध्ये वरूणने प्रमुख भूमिका साकारली होती. पहिल्या ‘जुडवा’तील ‘टन टना टन’  या गाण्यावर वरूणने त्या चित्रपटाची नायिका करिष्मा कपूरबरोबर जोशपूर्ण नृत्य केले. इतकेच नव्हे, तर हे नृत्य करताना तो व्यासपिठावरून खाली उतरला आणि तिथे बसलेल्या जॅकेलिन फर्नांडिसबरोबरही त्याने या गाण्यावर ताल धरला. या गाण्यावर प्रथमच दोन पिढ्यांतील आघाडीच्या अभिनेत्रींनी वरूणबरोबर नृत्य केले.

काही दिवसांपूर्वी वरुण आणि करिष्मा कपूर जुडवाँ सिनेमाच्या गाण्यावर थिरकताना दिसले होते. त्यानंतर वरुण आणि करिष्माचा हा व्हिडीओही व्हायरल झाला होता. सध्या जुडवाँ-2 या सिनेमाच्या गाण्यांनी रसिकांना वेड लावले. या सिनेमातील टना टना टन आणि ऊँची है बिल्डिंग या गाण्यांचं नवं वर्जन रसिकांना चांगलंच भावलं. त्यामुळे जुडवाँ-2 सिनेमाचं प्रमोशन करण्यात सिनेमाची टीम कोणतीही कसर सोडली नव्हती.

Web Title: Varun Dhawan shakes a leg with Karishma Kapoor and Jacquline Fernandes on ‘Tan Tana Tan’