'अंगुरी भाभी’ला पटवण्यासाठी विभूतीजींचा नवा प्लान !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 18:25 IST2016-06-21T12:55:29+5:302016-06-21T18:25:29+5:30
छोट्या पडद्यावरील 'भाभी जी घर पर है' या मालिकेत विभूतीजी (आसिफ शेख) ‘अंगुरी भाभी’ला पटवण्यासाठी ना-ना त-हाचे फंडे आजमवतात. ...

'अंगुरी भाभी’ला पटवण्यासाठी विभूतीजींचा नवा प्लान !
‘अंगुरी भाभी’ला पटवण्यासाठी ना-ना त-हाचे फंडे आजमवतात. कधी ते सुपरमॅन
बनतात तर कधी आणखी काही. आता तर विभूतीजी यांनी अंगुरी भाभीचं मन
जिंकण्यासाठी नवा प्लान तयार केलाय. आगामी भागात विभूतीजी आरजे बनल्याचं
पाहायला मिळेल. या मालिकेतील सगळे नागरिक एका आगामी रेडिओ शोची आतुरतेनं
वाट पाहत असतात. या शोचं त्यांना जणू काही वेडच लागलं. विभूतीजी यांना
समजतं की या रेडिओ शोचा होस्ट सक्सेना (सानंद शर्मा) आहे. त्यामुळं
अंगुरी भाभीला इंम्प्रेस करण्यासाठी विभूतीजी सक्सेनाकडे एक शो होस्ट
करण्याची मागणी करतात. मात्र ती मागणी सक्सेना धुडकावून लावतो. मात्र
एवढ्यातच हार मानतील ते विभूतीजी नाही. त्यांच्याकडे आरजे बनण्याचे नवनवे
फंडे आहेत.हेच फंडे आगामी काळात रसिकांचं मनोरंजन करतील आणि हसवून हसवून
वेड लावतील.