​ वंदना गुप्ते, स्वानंदी टिकेकर आणि अक्षय वाघमारे झळकणार गुलमोहरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 10:30 IST2018-03-07T05:00:02+5:302018-03-07T10:30:02+5:30

कुटुंबाचा केंद्रबिंदू असलेली स्त्री म्हणजेच मुलाची आई, जेव्हा सूनरूपी दुसरी स्त्री घरात येते, तेव्हा साधारणपणे तिची मानसिकता बदलते अर्थात ...

Vandana Gupte, Swanandi Tikekar and Akshay Wagmare will be seen in Gulmohar | ​ वंदना गुप्ते, स्वानंदी टिकेकर आणि अक्षय वाघमारे झळकणार गुलमोहरमध्ये

​ वंदना गुप्ते, स्वानंदी टिकेकर आणि अक्षय वाघमारे झळकणार गुलमोहरमध्ये

टुंबाचा केंद्रबिंदू असलेली स्त्री म्हणजेच मुलाची आई, जेव्हा सूनरूपी दुसरी स्त्री घरात येते, तेव्हा साधारणपणे तिची मानसिकता बदलते अर्थात अत्यंत प्रेमाने आदराने नीटच नाते जोपासणाऱ्या पुष्कळ स्त्रिया आहेत. मात्र “सासूबाई’ ही उपाधी लागली की सत्ता, मानपान, तुलना आणि अपेक्षा या विकारांमध्ये ती जखडली जाऊ शकते. याउलट सासू, सुना सुज्ञ,समंजस असतील तर घरातले वातावरण खूपच चांगले होते. दर आठवड्याला नात्यांची नवी गोष्ट सांगण्याचे वचन झी युवा पाळत आहे. हीच परंपरा कायम राखत एक सुंदर कथा ही वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलेली आहे. जगाच्या पाठीवर कायमच चर्चेत असलेले एक नाते म्हणजे सासू आणि सूनेचे नाते. याच नात्याची एक गमतीदार गोष्ट येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक १२ मार्च आणि १३ मार्चला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सासूच्या भूमिकेत वंदना गुप्ते, शिवानीच्या भूमिकेत स्वानंदी टिकेकर आणि जयच्या भूमिकेत अक्षय वाघमारे या कथेतून भेटणार आहेत.
आईच्या आदरयुक्त धाकात वाढलेला जय. एका बोल्ड अँड ब्युटिफुल मुलीच्या म्हणजेच शिवानीच्या प्रेमात पडतो खरा... पण आईला हे कसं सांगणार हा प्रश्न त्याला पडलेला असतो. शिवानी मात्र आजच्या तरुणींचं प्रतिनिधित्व करणारी आहे. आपल्याला जे हवं ते मिळवण्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी आहे. जयच्या अपरोक्ष जयची आई त्याच्यासाठी मुली शोधते आहे. पण अचानक जय आणि शिवानी लग्न करून दारात उभे राहतात. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आईला धक्का बसतो. आता आई जय आणि शिवानीला घरात घेणार का? सून म्हणून शिवानीला आता काय काय करावे लागणार? शिवानी या परिक्षांमध्ये पास होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना गुलमोहर मधील सासू, सून आणि तो या कथेत मिळणार आहेत. 
वंदना गुप्ते, स्वानंदी टिकेकर आणि अक्षय वाघमारे यांसारखे कलाकार सासू, सून आणि तो या कथेत असल्याने प्रेक्षकांना ही कथा चांगलीच भावेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : राणी वर्मा यांचा जश्न-ए-हुस्न लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

 

Web Title: Vandana Gupte, Swanandi Tikekar and Akshay Wagmare will be seen in Gulmohar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.