Valentine day special: छोट्या पडद्यावर रंगणार “तुझी माझी लव्ह स्टोरी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 17:59 IST2017-02-10T07:29:13+5:302017-02-10T17:59:38+5:30

प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं अन् आमचं सेम असतं... हेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेन्टाईन डे जणू  प्रेमाचा ...

Valentine Day special: "My My Story" will be playing on the small screen | Valentine day special: छोट्या पडद्यावर रंगणार “तुझी माझी लव्ह स्टोरी”

Valentine day special: छोट्या पडद्यावर रंगणार “तुझी माझी लव्ह स्टोरी”

रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं अन् आमचं सेम असतं... हेच प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेन्टाईन डे जणू  प्रेमाचा उत्सवच... मग या उत्सवाचं सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं... व्हॅलेन्टाईन डे निमित्त खास प्रेक्षकांसाठी छोट्या पडद्यावर याच प्रेमाच्या रंगाची उधळण होणार आहे. प्रेमाचे अनेकविध रंग आणि छटा उलगडून दाखवणारा “तुझी माझी लव्ह स्टोरी”  लव्हेबल कार्यक्रम रसिकांना छोट्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.आपल्या खास अंदाजात पर्ण पेठे  आणि 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम सुव्रत जोशीने केले. सूत्रसंचालन करत उपस्थितांना  फुल ऑन एंटरटेन केले. सरस्वती मालिकेमधील आस्ताद काळे, तितिक्षा तावडे (सरस्वती) यांनी सगळ्यांना आवडलेल्या ''हम्मा हम्मा'' तसेच ‘लडकी कर गई चूल’ या धम्माकेदार गाण्यावर डान्स केला.




तर सख्या रे मालिकेमधील सुयश टिळक (समीर, रणविजय) – रुची सवर्ण मोहन (प्रियंवदा) यांनी ‘लेट्स नाचो’ या गाण्यावर डान्स केला. 




तसेच आपल्या खुशखुशीत विनोदशैलीने संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडणाऱ्या कल्लाकारांनी त्यांच्या विनोदी स्कीट करत जमलेल्या सर्व प्रेक्षकांना हसूहसून लोटपोट होतील इतके भरघोस मनोरंजन केले.  मानसी कुलकर्णी, भक्ती रत्नपारखी, योगेश शिरसाट आणि समीर चौगुले यांनी अफलातून कॉमेडी – लव्हेबल स्कीट केले जे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. 



आपल्या अदांनी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली, जिच्या नृत्याचे सगळेच दिवाने आहेत अशी नृत्यांगना मानसी नाईक आणि सिध्देश पै यांच्या नृत्यातून प्रेमाच्या अनेक छटा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. शाळेपासून कॉलेजपर्यंत तसेच लग्नानंतर असलेल्या प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना नृत्य आणि स्कीटच्या रुपात पहायला मिळणार आहे. पहिले प्रेम हे नेहेमीच सगळ्यांच्या जवळचे असते या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहचावल्या चिमुकल्यांनी त्यांच्या सुंदर नृत्यातून. टिक टिक वाजते आणि हृदयात वाजे या गाण्यातून त्या वयातील निरागस प्रेम हे चिमुकल्या मुलांनी आपल्या नृत्यातून दाखविले.



या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली जेंव्हा केतकी माटेगावकर हिने आपल्या सुरेल आणि मधुर आवाजामध्ये प्रियकरा आणि जीव गुंतला हे गाणे गाऊन जमलेल्या सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
 

जेंव्हा वैभव तत्ववादी याने सावर रे आणि येड लागले या गाण्यावर पॉवरपॅक डान्स केला ज्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव केला या पॉवरपॅक डान्सने या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली होती.तसेच पुष्कर जोग, मृण्मयी गोंधळकर या दोघांनी ''जनम जनम'' आणि 'आशिकी 2' मधील ''हम तेरे बिन'' या रोमँटिक गाण्यावर खूप सुंदर डान्स सादर केला तर पुष्कर जोग, मीरा जोशी आणि संकेत पाठक यांनी ए दिल है मुश्कील, इश्क वाला लव्ह या गाण्यावर परफॉर्मन्स देत रसिकांची वाह वा मिळवली. छोट्या पडद्यावरील तुमच्या आवडत्या कलाकरांची ही सगळी डान्स धम्माल पाहणे नक्कीच एक मनोरंजनची ट्रीट म्हणावी लागेल.

Web Title: Valentine Day special: "My My Story" will be playing on the small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.