वैशाली ठक्कर आणि अनिता कन्वल परमीत सेठीच्या मालिकेद्वारे परतल्या छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 12:11 IST2016-12-24T12:11:49+5:302016-12-24T12:11:49+5:30

वैशाली ठक्करने बा बहू और बेबी, उतरण यांसारख्या मालिकांत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. उतरण या मालिकेनंतर ती गेल्या एक ...

Vaishali Thakkar and Anita Convle Parmeet Sethi on the small screen returned by the series | वैशाली ठक्कर आणि अनिता कन्वल परमीत सेठीच्या मालिकेद्वारे परतल्या छोट्या पडद्यावर

वैशाली ठक्कर आणि अनिता कन्वल परमीत सेठीच्या मालिकेद्वारे परतल्या छोट्या पडद्यावर

शाली ठक्करने बा बहू और बेबी, उतरण यांसारख्या मालिकांत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. उतरण या मालिकेनंतर ती गेल्या एक वर्षापासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. पण आता ती हर मर्द का दर्द या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर परतली आहे. या मालिकेद्वारे आणखी एक अभिनेत्री छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अनिता कन्वलने जिंदगी अभी बाकी है मेरे घोस्ट या मालिकेत काही महिन्यांपूर्वी काम केले होते. पण तीदेखील कित्येक महिन्यांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. या मालिकेत ती आता एका प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
हर मर्द का दर्द या मालिकेचे दिग्दर्शक प्रसिद्ध अभिनेता परमित सेठी करणार आहे. परमितने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, दिलजले यांसारख्या चित्रपटात काम केले आहे तर बदमाश कंपनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हर मर्द का दर्द या मालिकेची कथा ही सध्याच्या मालिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. प्रत्येक स्त्रीची इच्छा जाणून घेण्याची एक सुपर पॉवर नायकाला मिळते. पण या शक्तीमुळे त्याला किती त्रास सहन करावा लागतो अशी या मालिकेची कथा आहे. या मालिकेत वैशाली नायकाच्या आईची तर अनिता त्याच्या आजीची भूमिका साकारत आहे. अनिता या मालिकेविषयी सांगते, "छोट्या पडद्यावर एकही मालिका करायची नाही असे मी गेल्या काही महिन्यांपासून ठरवले होते. पण एक अभिनेत्री म्हणून अभिनयापासून मी दूर राहूच शकत नव्हती. त्यामुळेच मी या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर परतली आहे."

Anita Kanwal back on television


Web Title: Vaishali Thakkar and Anita Convle Parmeet Sethi on the small screen returned by the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.