"ही घरातून बाहेर गेली पाहिजे", इरिनाला बोलल्याने वैभवचा आवाज चढला, निक्कीने लाथ मारली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 12:14 IST2024-08-23T12:13:24+5:302024-08-23T12:14:03+5:30

इरिनाला बोलल्याने वैभव चव्हाणचा निक्कीवर आवाज वाढला असून तिने संतापाच्या भरात

vaibhav chavan fight with nikki tamboli for irina rudacova in bigg boss marathi 5 | "ही घरातून बाहेर गेली पाहिजे", इरिनाला बोलल्याने वैभवचा आवाज चढला, निक्कीने लाथ मारली अन्...

"ही घरातून बाहेर गेली पाहिजे", इरिनाला बोलल्याने वैभवचा आवाज चढला, निक्कीने लाथ मारली अन्...

बिग बॉस मराठीच्या नवीन घरातील चौथा आठवडा सुरु झालाय. या आठवड्यात नॉमिनेशन कार्य आणि कॅप्टनसी टास्क पार पडला आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन घरात निक्की तांबोळी घराची नवीन कॅप्टन झालीय. निक्की कालच्या टास्कमध्ये संचालकही होती. निक्कीने तीन आठवड्यात विविध कारणांनी बिग बॉस मराठीचं घर चांगलंच गाजवलंय. आज पुन्हा एकदा निक्की घरात राडा करताना दिसणार हे नक्की. निक्की आणि वैभवमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचं नवीन प्रोमोत दिसतंय. 

निक्की-वैभवमध्ये वादाची ठिणगी

झालं असं की, निक्की-वैभव-अरबाज-इरिना हे चौघे गार्डन एरियात बसले होते. तेव्हा निक्की मोठ्याने इरिनाला उद्देशून म्हणाली, "बरं झालं नॉमिनेट झाली. आता एलिमिनेट पण झाली पाहिजे. ती माझ्या ग्रुपमध्ये आधीपासून नव्हती. ती add on झालीय." वैभव हे ऐकताच चांगला भडकतो. तो म्हणतो, "अती होतंय निक्की आता. तुझं काहीतरी फालतू ऐकून घेणार नाही मी." निक्की वैभवला रागात म्हणते, "तुला नाही बोलली मी एरिनाला बोलली. तू कानात बोटं घाल." पुढे वैभव निक्कीला बोलतो की, "तुझ्या पण हातात बोटं आहेत ना तोंडात घाल." शेवटी निक्की वैभवला म्हणते की, "ती तुला घरातून घेऊन नाही आली माझा PA म्हणून." असं म्हणत ती टेबलवरच्या प्लेट्सना लाथा मारून खाली फेकते.


या आठवड्यात वैभन-इरिना दोघेही नॉमिनेट

कालच बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कमध्ये कार्याअंती घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी वैभव चव्हाण, इरिना रुडाकोव्हा,  अभिजीत सावंत आणि आर्या जाधव हे चौघे नॉमिनेट झाले आहेत. वैभव-इरिना या दोघांमध्ये चांगलं बॉंडींग झालंय. हे दोघेही या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट आहेत. आता या चार नॉमिनेटेड सदस्यांपैकी कोण घराबाहेर जाणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

Web Title: vaibhav chavan fight with nikki tamboli for irina rudacova in bigg boss marathi 5