अभिनेता विवियन डिसेनासोबतचा 8 वर्षांचा संसार मोडल्यानंतर अभिनेत्रीची झाली होती अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 16:52 IST2023-03-30T16:29:33+5:302023-03-30T16:52:14+5:30

पतीपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीला एक गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता.

Vahbiz dorabji condition was bad after divorce from vivian dsena this serious illness made life difficult | अभिनेता विवियन डिसेनासोबतचा 8 वर्षांचा संसार मोडल्यानंतर अभिनेत्रीची झाली होती अशी अवस्था

अभिनेता विवियन डिसेनासोबतचा 8 वर्षांचा संसार मोडल्यानंतर अभिनेत्रीची झाली होती अशी अवस्था

टीव्ही अभिनेता विवियन डिसेना आणि अभिनेत्री वाहबीज दोराबजी लग्नाच्या ८ वर्षानंतर विभक्त झाले. विवियन 'जोडी की ये एक कहानी', 'मधुबाला', 'शक्ती' यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये अभिनय करून लोकप्रियता मिळवली. वाहबीज 'सरस्वतीचंद्र', 'पीर की ये एक कहानी', 'बहू हमारी रजनीकांत'मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे.


'जोडी की ये एक कहानी'च्या सेटवर दोघांची ओळख झाली. 2013 मध्ये दोघांचे लग्न झाले. पण 2016 पासून ते एकाच छताखाली राहत नाहीत. एका वर्षानंतर, विवियन-वाहबीझने घटस्फोटासाठी अर्ज केला. त्या घटनेच्या चार वर्षांनंतर, दोन्ही स्टार्सने त्यांच्या विभक्त झाल्याबद्दल सांगितलं.

परस्पर संमतीने झाला होता घटस्फोट
विवियन आणि वाहबीझ यांनी सांगितले की, विभक्त होण्याचा निर्णय दोघांनी परस्परांच्या संमतीने घेतला. ते म्हणाले होते, आम्ही कायदेशीररित्या घटस्फोट घेत आहोत याचं अत्यंत दु:ख होत आहे. गेली चार वर्षे आम्ही नाते टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आम्हाला असे वाटते की आपण वेगळे आयुष्य जगलो तर बरं होईल."

मीडिया रिपोर्टनुसार, विवियनपासून विभक्त झाल्यानंतर वाहबीजला डायबिटीजने घेरले होते. वाहबीजला तिच्या 
 तब्येतीची काळजी वाटत होती. मात्र आता तिची प्रकृती एकदम ठीक आहे. सध्या ती आपलं सिंगल लाईफ एन्जॉय करतेय. तर विवियनने दुसरं लग्न केलं आहे चार महिन्यांपूर्वी तो एका मुलीचा वडीलदेखील झाला आहे. 

काही दिवसांपूर्वी एक मुलाखती दरम्यान विवियान म्हणाला,  “होय, मी विवाहित आहे आणि चार महिन्यांच्या मुलीचा बाप आहे. यात कोणती मोठी गोष्ट आहे? जेव्हा मला वाटेल की ती योग्य वेळ आहे तेव्हा मी माझ्या लग्नाची आणि मुलीच्या आगमनाची घोषणा करेन. मी एक वर्षापूर्वी इजिप्तमध्ये एका खाजगी समारंभात नौरान अलीशी लग्न केले. दोघांची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली. नूरनला विवियनची मुलाखत घेण्याची इच्छा होती. पण विवियनने अनेकदा मुलाखत टाळली. शेवटी एकदा तो हो म्हणाला आणि त्यांच्यात मैत्रीही झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.. विवियनला एका महिन्यातच हे कळून चुकलं होतं की त्याला नूरन आवडायला लागली आहे. 

Web Title: Vahbiz dorabji condition was bad after divorce from vivian dsena this serious illness made life difficult