"रामदास आठवलेंना बिग बॉसमध्ये पाठवा, मज्जा येईल" ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णींनी व्यक्त केली इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:08 IST2026-03-11T12:07:43+5:302026-03-11T12:08:32+5:30
'बिग बॉस मराठी'चे सहावे पर्व सध्या वादांमुळे आणि नवनवीन वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे चांगलंच गाजत आहे.

"रामदास आठवलेंना बिग बॉसमध्ये पाठवा, मज्जा येईल" ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णींनी व्यक्त केली इच्छा
'बिग बॉस मराठी'चे सहावे पर्व सध्या वादांमुळे आणि नवनवीन वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे चांगलंच गाजत आहे. आता बिग बॉसच्या पहिल्या पर्वातील सर्वात गाजलेल्या स्पर्धक आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे. एका राजकीय नेत्याने बिग बॉसच्या घरात जायला हवे, असे सांगताना त्यांनी थेट रामदास आठवले यांचे नाव घेतले आहे.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी यांना विचारण्यात आले की, कोणत्या राजकीय नेत्याने बिग बॉसमध्ये जायला हवे? त्यावर आपल्या खास शैलीत उत्तर देताना त्या म्हणाल्या, "रामदास आठवलेंना पाठवा, खूप मज्जा येईल. ते तिथे जाऊन कविता करतील आणि लोकांचे मनोरंजन होईल. मुळात अनेक लोक त्यांची नक्कल करतात, त्यापेक्षा ते स्वतः तिथे गेले तर जास्त रंगत येईल".
यावेळी उषा नाडकर्णी यांनी अभिनेता सागर कारंडे याच्यासोबत घडलेला एक जुना किस्साही सांगितला. त्या म्हणाल्या, "सागर कारंडेने 'चला हवा येऊ द्या' मध्ये आठवलेंची नक्कल केली होती. ते बोलता बोलता झोपतात, असे सागरने दाखवले होते. त्यानंतर त्याला मारायला लोक आले होते. पण जर आठवले स्वतः बिग बॉसमध्ये गेले, तर त्यांच्यातला कवी संपूर्ण महाराष्ट्राला कळेल आणि त्यांनाही तिथे जाऊन नक्कीच बरं वाटेल".
बिग बॉस मराठी ६
बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात आतापर्यंत दिव्या शिंदे, राधा मुंबईकर, सोनाली राऊत, करण सोनावणे, आयुष संजीव, रोशन भजनकर, सचिन कुमावत आणि रुचिता जामदार हे स्पर्धक बाहेर पडले आहेत. तर संकेत पाठक, रेवा कौरासे आणि संस्कृती साळुंके यांनी 'वाईल्ड कार्ड' म्हणून घरात एन्ट्री केली आहे.