Uffff! Urfi Javed ने होळीला घातला असा ड्रेस, व्हिडीओ बघून फॅन्स झाले घायाळ....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 14:08 IST2023-03-09T14:07:18+5:302023-03-09T14:08:10+5:30

Urfi Javed Dress On Holi : हेही तितकंच खरं आहे की, ती एक सोशल मीडिया स्टार आहे. लोक काय बोलतात याचा तिला काही फरक पडत नाही. होळीलाही तिने असाच एक भडक ड्रेस घातला जो पाहून लोक अवाक् झाले. 

Urfi Javed's holi special transparent dress watching video | Uffff! Urfi Javed ने होळीला घातला असा ड्रेस, व्हिडीओ बघून फॅन्स झाले घायाळ....

Uffff! Urfi Javed ने होळीला घातला असा ड्रेस, व्हिडीओ बघून फॅन्स झाले घायाळ....

Urfi Javed Dress On Holi: उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या बोल्ड आणि विचित्र कपड्यांसाठी ओळखली जाते. ती नेहमीच अजब कपडे घालून मीडियासमोर येते आणि लगेच तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही लोकांना ती आवडते तर काही लोक तिच्या फॅशनवर भडकतात. पण हेही तितकंच खरं आहे की, ती एक सोशल मीडिया स्टार आहे. लोक काय बोलतात याचा तिला काही फरक पडत नाही. होळीलाही तिने असाच एक भडक ड्रेस घातला जो पाहून लोक अवाक् झाले. 

बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडल्यापासून उर्फी जावेद (Urfi Javed Video) ने आपल्या अनोख्या फॅशनने सगळ्यांनाच अवाक् केलंय. अनेकदा तिच्यावर टीकाही होते. सद्या तिच्या होळीच्या लूकने धुमाकूळ घातला आहे. तिचा व्हिडीओ पाहून लोक स्तब्ध झाले आहेत. उर्फी जावेद पांढऱ्या आउटफिट दिसत आहे. हा व्हिडीओ तिने इन्स्टावर शेअर केलाय.

ऊर्फी जावेद या व्हिडिओमध्ये गुलाल उडवताना दिसत आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं की, आमची होळी बेकार करण्याची हिची हिंमत कशी झाली. तर दुसऱ्या एकाने लिहिलं की, हिने तर चांगल्या डिझायनरना मागे सोडलं. अशा वेगवेगळ्या कमेंट्स तिच्या व्हिडिओवर येत आहेत.

Web Title: Urfi Javed's holi special transparent dress watching video