Urfi Javed : ही कोणती स्टाईल ! कारमध्ये बसताना उर्फीची झाली फजिती; व्हिडिओ तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 16:33 IST2023-01-12T16:22:56+5:302023-01-12T16:33:10+5:30
उर्फीची नवी करामत समोर आली आहे जे बघून ट्रोलर्सने तिच्यावर निशाणा साधला आहे.

Urfi Javed : ही कोणती स्टाईल ! कारमध्ये बसताना उर्फीची झाली फजिती; व्हिडिओ तुफान व्हायरल
Urfi Javed : कायमच आपल्या विचित्र कपड्यांनी चर्चेत राहणारी उर्फी जावेद हिचा आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. उर्फी बाहेर आली की फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स तिला कॅमेऱ्यात कैद करणासाठी तयारच असतात. तिची सुद्धा रोज काहीतरी विचित्र स्टाईल असते. तर आता उर्फीची नवी करामत समोर आली आहे जे बघून ट्रोलर्सने उर्फीवर निशाणा साधला आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांच्या अकाऊंटवरुन उर्फीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. उर्फीने पूर्ण काळ्या रंगाचा आऊटफिट घातला आहे. ऑफ शोल्डर आणि ऑफ स्लीव्ह्ज नेट चा ब्लाऊज तिने घातला आहे. आणि नेटचीच फुल पॅंट घातली आहे. तर ब्लॅक हिल्स आहेत. गंमत तेव्हा आली जेव्हा उर्फी कारमध्ये बसत होती. तेव्हा तिला नीट बसताच येत होते. तेव्हा तिची झालेली फजिती बघून सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात येत आहे. ही कोणती स्टाईल आहे अशी कमेंट ट्रोलर्सने केली आहे.
या व्हिडिओवर ट्रोलर्स अक्षरश: तुटून पडले आहेत. स्टाईल नाही असा ड्रेस घातल्याने तिची मजबुरी आहे असे एकाने म्हणले आहे. तर प्रसिद्दीसाठी काहीही करतात असं म्हणत लोक वैतागले आहेत.
जावेद अख्तर यांच्या संपत्तीत मागितला वाटा
उर्फी जावेद तिच्या कामासाठी दिल्लीत होती. ती ज्या विमानात होती त्याच फ्लाईटमध्ये जावेद अख्तर देखील प्रवास करत होते. इथेच तिची त्यांच्याशी भेट झाली. तिथून येताना विमानतळावर उर्फीला फोटोग्राफर्सने घेरले. तेव्हा फोटोग्राफर्सने जावेद अख्तर यांच्या भेटीविषयी विचारले. यावर उर्फी म्हणाली, 'ते खूप चांगले आहेत. आम्ही एकाच फ्लाईटमध्ये होतो. तुम्हाला माहितीए का मी त्यांची नात आहे. आता त्यांच्या संपत्तीचे तीन हिस्से होतील.