‘Bigg Boss OTT ’मध्ये पहिलं एलिमिनेशन, कोण गेलं घराबाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 10:33 IST2021-08-16T10:32:27+5:302021-08-16T10:33:25+5:30

Bigg Boss OTT : आठवडाभर बिग बॉसच्या घरात अनेक वादविवाद झालेत. साहजिकच ‘संडे का वॉर’मध्ये करण जोहरन सर्वांचा क्लास घेतला दिसला.

Urfi Javed is the first evicted contestant of Bigg Boss OTT | ‘Bigg Boss OTT ’मध्ये पहिलं एलिमिनेशन, कोण गेलं घराबाहेर?

‘Bigg Boss OTT ’मध्ये पहिलं एलिमिनेशन, कोण गेलं घराबाहेर?

ठळक मुद्देगेल्या आठवड्यात नेहा भसीन आणि मूस जट्टाना या दोघींमुळे बिग बॉसच्या घरात दोन गट पडलेले दिसले.

गेल्या रविवारी सुरू झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी’  (Bigg Boss OTT ) या शोला एक आठवडा उलटला आणि काल एक आठवड्यानंतर या शोमधील पहिलं एलिमिनेशन झालं. आठवडाभर बिग बॉसच्या घरात अनेक वादविवाद झालेत. साहजिकच ‘संडे का वॉर’मध्ये करण जोहरन सर्वांचा क्लास घेतला दिसला.

उर्फी जावेद घरातून बाहेर
पहिल्या आठवड्यात राकेश बापट, शमिता शेट्टी व उर्फी जावेद हे तिघे एलिमेशनसाठी नॉमिनेट झाले होते.  राकेश बापट व शमिता शेट्टीला जीवनदान मिळालं आणि करणने प्रेक्षकांच्या मतांच्या आधारावर उर्फीला (Urfi Javed) घराबाहेर काढलं.

दिव्या अग्रवालचा घेतला क्लास..
सलमान खानला बिग बॉसच्या कंटेस्टंटची शाळा घेताना तुम्ही पाहिले आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये करण जोहर दिव्या अग्रवालचा क्लास घेताना दिसला. तू इथे स्वत:च्या मर्जीनं आली आहेस. तुला कुणीही इथे येण्यासाठी बळजबरी केलेली नाही. तेव्हा बळजबरीनं इथं आली, असं म्हणू नकोस, अशा कठोर शब्दांत त्यानं दिव्याला खडसावलं. यानंतर, करणने प्रतिकलाही प्रश्न केला. असं काय झाले की अचानक त्याची वागणूक शोमध्ये बदलली. तो कोणत्या प्लानसह शोमध्ये आला का? असा सवाल त्याने केला. यावर मी असाच आहे, असं प्रतिक म्हणाला.

 मूस-नेहावरून घरात दोन गट

गेल्या आठवड्यात नेहा भसीन आणि मूस जट्टाना या दोघींमुळे बिग बॉसच्या घरात दोन गट पडलेले दिसले.  नेहा व मूस यांच्यात भांडी घासण्यावरून भांडण झाले. काही लोक नेहाच्या बाजूने तर काहीजण मूसची बाजू घेताना दिसले. या भांडणानंतर नेहा रडताना दिसली. या भांडणानंतर केवळ प्रतीक आणि निशांत सोडून उर्वरित सर्वांनी नेहाला सपोर्ट केला. नेहा भसीन व प्रतिक यांच्यात  भांडणाचा एक अध्यायही गाजला.

 

Web Title: Urfi Javed is the first evicted contestant of Bigg Boss OTT