​उपेंद्र लिमयेची संवेदनशील बाजू नकुशी टीमला दिसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 13:58 IST2017-09-11T08:28:24+5:302017-09-11T13:58:24+5:30

काहीच दिवसांपूर्वी पावसाच्या तडाख्याने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्त्यांना नदीचे रूप आल्याने अनेकजण ठिकठिकाणी अडकले होते. ऑफिसमधून निघालेल्या ...

Upendra Limaye's sensitive side looked at the unfortunate team | ​उपेंद्र लिमयेची संवेदनशील बाजू नकुशी टीमला दिसली

​उपेंद्र लिमयेची संवेदनशील बाजू नकुशी टीमला दिसली

हीच दिवसांपूर्वी पावसाच्या तडाख्याने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्त्यांना नदीचे रूप आल्याने अनेकजण ठिकठिकाणी अडकले होते. ऑफिसमधून निघालेल्या कर्मचाऱ्यांना घरी कसे जायचे हा प्रश्न पडला होता. स्टार प्रवाहच्या नकुशी मालिकेच्या टीमलाही पाऊसाचा चांगलाच सामना करावा लागला. या मालिकेच्या सेटवरदेखील खूप पाणी भरले होते.
नकुशी या मालिकेचे चित्रीकरण मीरा रोड येथे केले जाते. तिथे या मालिकेचा भला मोठा सेट आहे. नकुशी या मालिकेतील बग्गीवाला चाळीचा सेट तिथेच लावण्यात आला आहे. पाऊस पडला त्यादिवशी सेटवर जवळपास गुडघाभर पाणी होते. गाड्या पाण्यात पूर्णपणे अडकल्या होत्या. पाऊस थांबतच नसल्याने बाहेर पडणेही शक्य नव्हते. संपूर्ण टीमच सेटवर अडकली असल्याने मालिकेच्या निर्मात्यांनी जेवणाची कशीबशी व्यवस्था केली. या परिस्थितीमुळे अभिनेता उपेंद्र लिमये, प्रसिद्धी, राजेश भोसले यांच्यासह मालिकेच्या संपूर्ण टीमला सेटवरच रात्र काढावी लागली.
घरी जाता येत नसल्याने अभिनेता उपेंद्र लिमये चांगलाच चिंतेत होता. कारण त्याचा मुलगा आजारी असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मुलगा हॉस्पिटलमध्ये असूनही उपेंद्रने चित्रीकरणाला सुट्टी घेतली नव्हती. तो हॉस्पिटल आणि चित्रीकरण अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत होता. पण प्रचंड पाऊस असल्याने उपेंद्रला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाता आले नाही. मात्र त्याची पत्नी सतत हॉस्पिटलमध्ये त्याच्या मुलासोबत होती. त्यांच्या मुलाची जबाबदारी एका दिवसासाठी संपूर्णपणे तिने पेलली होती. त्यामुळे उपेंद्रची काळजी पूर्णपणे मिटली. व्यावसायिक अभिनेता आणि काळजी करणारा पिता अशी उपेंद्रची दोन संवेदनशील रूपं त्या दिवशी 'नकुशी'च्या टीमला पाहायला मिळाली.

Also Read : ​उपेंद्र लिमयेचे शूटिंग चक्क तीन वेळा थांबवावे लागले...!

Web Title: Upendra Limaye's sensitive side looked at the unfortunate team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.