​वारिस फेम अक्षय डोंगराने काढला युनिक टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 17:51 IST2017-01-06T17:51:35+5:302017-01-06T17:51:35+5:30

टॅटू काढण्याचे फॅड आपल्याला बॉलिवूड आणि टिव्ही कलाकारांमध्ये नेहमीच पाहायला मिळते. काहीजण आपल्या जोडीदाराचे तर काहीजण आपल्या मुलांच्या नावाचे ...

Unique Tattoo Removed by Heirloom Fame | ​वारिस फेम अक्षय डोंगराने काढला युनिक टॅटू

​वारिस फेम अक्षय डोंगराने काढला युनिक टॅटू

टू काढण्याचे फॅड आपल्याला बॉलिवूड आणि टिव्ही कलाकारांमध्ये नेहमीच पाहायला मिळते. काहीजण आपल्या जोडीदाराचे तर काहीजण आपल्या मुलांच्या नावाचे टॅटू काढताना दिसतात तर काहीजण एखादी डिझाइन अथवा सिम्बॉलचा टॅटू काढतात. पण वारिस या मालिकेत नकारात्मक भूमिकेत झळकत असलेल्या अक्षय डोंगराने एक वेगळाच टॅटू काढला आहे.
अक्षय नुकताच फिरायला बाली येथे गेला होता. तिथे त्याने त्याच्या मुलाच्या पहिल्या हृद्याच्या ठोक्याचा टॅटू काढला आहे. त्याची पत्नी गरोदर असताना जी सॉनोग्राफी करण्यात आली होती त्यात त्याला हा फोटो मिळाला होता. अक्षयचा हा 
टॅटू खूपच य़ुनिक आहे. या टॅटूविषयी अक्षय सांगतो, "माझ्यासाठी टॅटू काढणे ही काही फॅशन नाही आहे. टॅटू काढण्यामागे काहीतरी कारण अथवा काहीतरी भावना असते असे मला नेहमी वाटते. मला टॅटू माझ्या मुलासाठी काढायचा होता आणि असे काहीतरी काढायचे होते की, आयुष्यभर ते माझ्यासाठी स्पेशल असेल. मी माझ्या मुलाचा पहिला हृद्याचा ठोका ऐकला तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे त्या क्षणाला बंदिस्त करण्याचे मी ठरवले. माझ्या मुलाची हार्टबीट ऐकल्यानंतर आता माझ्या आयुष्यात एक स्पेशल व्यक्ती येणार आहे आणि त्यामुळे माझे आयुष्य पूर्ण बदलणार आहे याची मला जाणीव झाली होती. त्यामुळे त्याच्या हृदयाचा ठोक्याचा टॅटू मी हातावर काढला. याआधी मी बुद्धाचा टॅटू काढला आहे. बुद्धाची शिकवण मी मानत असल्याने हा टॅटू काढण्याचे मी ठरवले होते." 


Web Title: Unique Tattoo Removed by Heirloom Fame