अकुंश बनला प्रेमकवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 01:57 IST2016-03-02T08:57:10+5:302016-03-02T01:57:10+5:30
गुरू, दुनियादारी, दगडी चाळ या चित्रपटातून गुंडाची भूमिका करणारा अभिनेता अंकुश चौधरी आता, मात्र प्रेमकवी झाल्याचे दिसते.

अकुंश बनला प्रेमकवी
ग रू, दुनियादारी, दगडी चाळ या चित्रपटातून गुंडाची भूमिका करणारा अभिनेता अंकुश चौधरी आता, मात्र प्रेमकवी झाल्याचे दिसते. विचारात पडला असेल प्रेमकविता करायला अकुंश पुन्हा प्रेमात वगैरे पडला का? असे काही नाही,तर अकुंशने स्वत: काही वर्षापूर्वी केलेली प्रेम कविता त्याला आठवली. म्हणून त्याने ती प्रेमकविता स्वत: म्हणून दाखविली. जशी की, मी हा असा,ती ही अशी, जणू काही कप बशी.... अकुंशची ही कविता ऐकून मजा तर आलीच. पण एवढयावरच थांबेल तो अंकुश कसा? तो म्हणाला,कविता मला पूर्वी सुचत होत्या,म्हणून करत होतो. आता, कविता सुचत नाही तर धडे सुचतात.