उमेश – प्रिया बापटने पहिल्यांदाच शेअर केल्या या गोष्टी, स्वतः केला खुलासा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 15:03 IST2019-12-19T15:02:04+5:302019-12-19T15:03:43+5:30
मनोरंजन क्षेत्रातील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट पुढील आठवड्यामध्ये दोन स्पेशलच्या कट्यावर हे दोघे येणार आहेत.

उमेश – प्रिया बापटने पहिल्यांदाच शेअर केल्या या गोष्टी, स्वतः केला खुलासा !
उमेश – प्रिया बापट मराठीतील ही जोडगोडी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतात. याशिवाय नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असतात आणि या फोटोंमधून रसिकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसतात.
दोन स्पेशल कार्यक्रमामध्ये लवकरच आपल्या सगळ्यांची लाडकी जोडी बघायला मिळणार आहे. मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोड्यांविषयी आपल्या सगळ्यांनाच जाणून घ्यायला आवडते. त्यांचा प्रवास कसा होता ? त्यांच्या आठवणी, त्यांची विविध विषयांवरील मत ? आजवर दोन स्पेशल कार्यक्रमामध्ये गुरु शिष्याची जोडी, भावंडाची जोडी, मित्रांची जोडी येऊन गेली पण आता पहिल्यांदाच कार्यक्रमामध्ये नवरा – बायकोची जोडी येणार आहे.
मनोरंजन क्षेत्रातील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट पुढील आठवड्यामध्ये दोन स्पेशलच्या कट्यावर हे दोघे येणार आहेत. यांच्यासोबत अनेक मजेदार गप्पा, त्यांच्या आठवणी, त्यांची जोडी कशी जमली ? दोघे एकमेकांना किती ओळखतात ? हे रसिकांना बघायला मिळणार आहे. सध्या रसिकांच्या विशेष पंसतीस पडत असलेले 'दादा एक गुड न्यूज आहे' याची निर्मिती उमेश आणि प्रियाने केली. पहिल्यांदाच हे दोघे निर्मिती क्षेत्रामध्ये या नाटकाच्या निमित्ताने उतरले या दरम्यान त्यांना काय काय अनुभव आले, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास ? हे सगळे रसिकांना जाणून घेता येणार आहे.