गौतम रोडे दोन वर्षानंतर छोट्या पडद्यावर करतोय कमबॅक 'ह्या' मालिकेतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 06:30 IST2018-08-25T11:47:39+5:302018-08-27T06:30:00+5:30

गौतम रोडे दोन वर्षांच्या कालावधीनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. शेवटचे त्याने 'सूर्यपुत्र कर्ण' मालिकेत काम केले होते.

Two years later, Gautam Rode comeback on small screen | गौतम रोडे दोन वर्षानंतर छोट्या पडद्यावर करतोय कमबॅक 'ह्या' मालिकेतून

गौतम रोडे दोन वर्षानंतर छोट्या पडद्यावर करतोय कमबॅक 'ह्या' मालिकेतून

ठळक मुद्दे'कालभैरव रहस्य' मालिकेचा येणार दुसरा सीझन'कालभैरव रहस्य'च्या दुसऱ्या सीझनमध्ये गौतम रोडे मुख्य भूमिकेत

छोट्या पडद्यावरील अभिनेता गौतम रोडे छोट्या पडद्यावर दोन वर्षानंतर पुनरागमन करतो आहे. शेवटचे त्याने 'सूर्यपुत्र कर्ण' मालिकेत काम केले होते. सूत्रांकडून समजते आहे की त्याला कालभैरव रहस्य मालिकेच्या सेकंड सीझनमध्ये मुख्य भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. 'कालभैरव रहस्य' मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्मात्यांनी दुसरा सीझन बनवण्याचा निर्णय घेतला असून मालिकेतील कलाकारांच्या निवड प्रक्रियेला सुरूवात केली आहे. पहिल्या भागात छवी पांडे, राहुल शर्मा व सरगुन कौर प्रमुख भूमिकेत होते.

'कालभैरव रहस्य'च्या दुसऱ्या सीझनमधील मुख्य भूमिकेसाठी निर्मात्यांनी गौतम रोडे व अदिती गुप्ताला पसंती दिली आहे. ही मालिका एका मंदिरातील रहस्यावर आधारीत असणार आहे आणि यावेळेस मालिकेत बंगला व त्यात राहणारे कुटुंब आणि त्यांच्या जवळच्या मंदिरावर आधारीत असणार आहे.
या मालिकेत काम करण्याबाबत गौतम रोडेला विचारले असता तो म्हणाला की,' हो. मी या मालिकेत काम करणार आहे आणि त्याबाबत खूप उत्सुक आहे. याबाबत मी जास्त माहिती देऊ शकत नाही कारण ही मालिका सुरूवातीच्या स्टेजला आहे.'
तर दुसरीकडे अभिनेत्री अदिती गुप्ताने या मालिकेबाबत काहीही सांगण्यास नकार दिला आहे.
अदिती गुप्ताला शेवटचे 'इश्कबाज' मालिकेत रागिनी मल्होत्राच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. आता ती या मालिकेत दिसणार की नाही, हे जाणून घेणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 'कालभैरव रहस्य' मालिकेचा दुसरा सीझन स्टार भारत वाहिनीवर प्रसारीत होईल.

Web Title: Two years later, Gautam Rode comeback on small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.