नेहा जाणार चौधरींचं घर सोडून; रुसलेल्या सूनबाईंची मनधरणी करण्यासाठी आजोबा लढवणार शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 17:00 IST2022-05-03T16:59:36+5:302022-05-03T17:00:07+5:30
Mazi tuzi reshimgath:

नेहा जाणार चौधरींचं घर सोडून; रुसलेल्या सूनबाईंची मनधरणी करण्यासाठी आजोबा लढवणार शक्कल
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. सध्या ही मालिका चांगलीच चर्चेत येत असून तिच्यात येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना विशेष आवडत आहेत. काही दिवसांपूर्वीच नेहाचा पॅलेसमध्ये गृहप्रवेश झाला आहे. आजोबांची काळजी घेण्यासाठी चौधरींच्या घरात गेलेल्या नेहाने घरातील प्रत्येकाचं मन जिंकलं आहे. मात्र, सिम्मी अजूनही नेहाविरोधात कटकारस्थान रचत आहे. त्यामुळेच सध्या एका गोष्टीमुळे नाराज झालेल्या नेहाने चौधरींचं घर सोडलं आहे. मात्र, तिची समजूत काढण्यासाठी संपूर्ण चौधरी कुटुंब तिच्याकडे गेलं आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नेहा पॅलेस सोडून पुन्हा तिच्या घरी राहायला जाते. ही गोष्टी यश आणि आजोबांना समजल्यानंतर ते तिला घरी आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नेहा तयार होत नाही.
दरम्यान, नेहाची नाराजगी दूर करण्यासाठी आजोबा एक प्लॅन आखतात. त्यानुसार, यश, आजोबा, समीर, यशचे दोन्ही काका नेहाच्या घरी जाऊन तिची मनधरणी करतात. इतकंच नाही तर तिच्यासाठी खास गाणंही म्हणतात. त्यामुळे आता घडून गेलेल्या गोष्टी विसरुन नेहा पुन्हा पॅलेसवर जाणार का? तिचं पॅलेस सोडून जाण्याचं कारण समोर येणार का? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ही मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.