'तुझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होईल असं वागू नकोस'; अनघा-अभिमध्ये वादाची ठिणगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 17:49 IST2022-02-27T17:48:32+5:302022-02-27T17:49:04+5:30
Aai kuthe kay karte: अनघा, अरुंधतीची बाजू अभिषेक समोर मांडत असूनही तो वारंवार त्याकडे दुर्लक्ष करतो.

'तुझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होईल असं वागू नकोस'; अनघा-अभिमध्ये वादाची ठिणगी
'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या अनेक रंजक वळण येत असल्याचं पाहायला मिळत आहे.अनिरुद्ध आणि कांचन यांनी अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं आहे. परंतु, अनिरुद्ध आणि कांचन तिच्या चारित्र्यावर चिखल फेक करत असताना केवळ अनघा, आप्पा यांनीच तिची बाजू घेतली. तर अभिषेकनेही आपल्या वडिलांची साथ दिली. त्यामुळे संतापलेल्या अनघाने याविषयी अभिला फटकारलं आहे. इतंकच नाही तर मला लग्न केल्याचा पश्चाताप होईल असं वागू नकोस असा सल्लाही दिली आहे.
अलिकडेच स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अनघा आणि अभि यांच्यात कडाक्याचं भांडण होताना दिसत आहे.अनघा, अरुंधतीची बाजू अभिषेक समोर मांडत असूनही तो वारंवार त्याकडे दुर्लक्ष करतो. इतकंच नाही तर मला त्या भानगडीत पडायचं नाही असंही तिला ठणकावून सांगतो. यावर अनघा संतापते.
दरम्यान, स्वत:ची मतं मांडायला शिक असा सल्ला ती अभिला देते. सोबत मी स्वतंत्र विचाराची मुलगी आहे. त्यामुळे तूदेखील तुझ्या मतावर ठाम रहा आणि ते मुद्दे सगळ्यांसमोर मांड असं सांगते. सोबतच तुझ्याशी लग्न केल्याचा मला पश्चाताप होईल असं वागू नकोस असंही त्याला ठणकावून सांगते. आता या दोघांमधील वाद कुठपर्यंत जातोय, अभिला त्याच्या आईची बाजू मांडता येईल का हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.