टीव्हीवरील लोकप्रिय कपलचा ९ वर्षांनी घटस्फोट! पतीपासून वेगळं झाल्यावर 'बिग बॉस १९'मध्ये अभिनेत्री घेणार एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:42 IST2025-08-14T18:42:30+5:302025-08-14T18:42:55+5:30

लग्नानंतर ९ वर्षांनी हुनर हाली आणि मयंक गांधी घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळं होणार असल्याच्या चर्चा आहेत. दोघांमध्ये खटके उडत असल्याने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. 

tv couple hunal hali and mayank gandhi divorce after 9 years of marraige | टीव्हीवरील लोकप्रिय कपलचा ९ वर्षांनी घटस्फोट! पतीपासून वेगळं झाल्यावर 'बिग बॉस १९'मध्ये अभिनेत्री घेणार एन्ट्री?

टीव्हीवरील लोकप्रिय कपलचा ९ वर्षांनी घटस्फोट! पतीपासून वेगळं झाल्यावर 'बिग बॉस १९'मध्ये अभिनेत्री घेणार एन्ट्री?

गेल्या वर्षभरात अनेक सेलिब्रिटींनी घटस्फोट घेत पार्टनरपासून वेगळे होण्याचा मार्ग निवडला. आता टीव्हीवरील आणखी एका लोकप्रिय कपलचा घटस्फोट होत आहे. लग्नानंतर ९ वर्षांनी हुनर हाली आणि मयंक गांधी घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळं होणार असल्याच्या चर्चा आहेत. दोघांमध्ये खटके उडत असल्याने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. 

हुनर हाली आणि मयंक गांधी यांनी पारंपरिक पंजाबी पद्धतीने २०१६ मध्ये लग्न केलं होतं. दिल्लीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. आता लग्नाच्या ९ वर्षांनी ते वेगळे होत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून ते दोघं एकत्र दिसलेले नाहीत. याशिवाय त्यांनी एकमेकांसाठी पोस्टही केलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही काळापासून ते दोघेही वेगळे राहत आहेत. हुनर हालीने सोशल मीडियावरुन नवऱ्याचं गांधी हे आडनावही काढून टाकलं आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे. टेली चक्करने दिलेल्या माहितीनुसार, वकील असलेली सना खान हुनर हालीची बाजू कोर्टात मांडणार आहे. 

मयंकशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यानच हुनर हाली बिग बॉस १९मध्ये दिसण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. हुनरने पटिया बेब्स, कहानी घर घर की, वीर हनुमान या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर मयांक वो काला टीका, अदालत या शोमध्ये दिसला होता. 

Web Title: tv couple hunal hali and mayank gandhi divorce after 9 years of marraige

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.