टीव्ही अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकाशी केला साखरपुडा; ११:११ चा मुहुर्त गाठला, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:10 IST2026-02-06T16:08:51+5:302026-02-06T16:10:24+5:30

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकाशी साखरपुडा केला आहे. विशेष म्हणजे साखरपुड्यासाठी अभिनेत्री आणि दिग्दर्शकाने ११:११ चा मुहुर्तही गाठला. 

tv actress yesha rughani engaged with director narinder singh shared photo | टीव्ही अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकाशी केला साखरपुडा; ११:११ चा मुहुर्त गाठला, शेअर केले फोटो

टीव्ही अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकाशी केला साखरपुडा; ११:११ चा मुहुर्त गाठला, शेअर केले फोटो

सध्या कलाविश्वात अनेक सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहे. अशातच टीव्ही अभिनेत्रीनेही गुडन्यूज दिली आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकाशी साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे साखरपुड्यासाठी अभिनेत्री आणि दिग्दर्शकाने ११:११ चा मुहुर्तही गाठला. 

हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री येशा रुघानी हिने साखरपुडा केला आहे. येशाने दिग्दर्शक नरिंदर सिंहसोबत गुपचूप साखरपुडा केला. ३ फेब्रुवारीला अत्यंत साध्या पद्धतीने येशा आणि नरिंदर यांनी साखरपुडा करत त्यांचं रिलेशनशिप ऑफिशियल केलं. येशाने अगदी पारंपरिक लूक केला होता. त्यांच्या फोटोंमध्येही हा साधेपणा अगदी सहज दिसून येत आहे. मास्टर नंबर मानल्या जाणाऱ्या ११:११ चा मुहुर्त गाठत येशा आणि नरिंदर यांनी एकमेकांना अंगठी घातल्याचं अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


येशाने मुस्कान, 'हीरो: गायब मोड ऑन', 'कभी कभी इत्तेफाक से' आणि 'रब से है दुआ' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर नरिंदरही लोकप्रिय दिग्दर्शक आहे. ते दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यांनी कधीच त्यांचं रिलेशनशिप ऑफिशियल केलेलं नव्हतं. आता चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. 

Web Title : टीवी अभिनेत्री येशा रुघानी ने निर्देशक नरिंदर सिंह से सगाई की।

Web Summary : टीवी अभिनेत्री येशा रुघानी ने निर्देशक नरिंदर सिंह से सगाई कर ली है। 3 फरवरी को एक निजी समारोह में उन्होंने 11:11 के शुभ मुहूर्त को चुना। येशा 'मुस्कान' और अन्य धारावाहिकों में अपनी भूमिकाओं के लिए जानी जाती हैं। यह जोड़ा सालों से डेटिंग कर रहा था।

Web Title : TV actress Yesha Rughani gets engaged to director Narinder Singh.

Web Summary : TV actress Yesha Rughani and director Narinder Singh are engaged. They had a private ceremony on February 3rd, choosing the auspicious 11:11 for the ring exchange. Yesha is known for roles in 'Muskaan' and other series. The couple had been dating for years.