मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्रीची कमाल! मुंबईत खरेदी केलं तब्बल ७ कोटींचं आलिशान घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:17 IST2026-02-21T12:16:17+5:302026-02-21T12:17:04+5:30

एका मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घर घेण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनेत्रीने मुंबईत तब्बल ७ कोटींचं घर खरेदी केलं आहे.

tv actress tejaswi prakash buys new home in mumbai for 7cr | मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्रीची कमाल! मुंबईत खरेदी केलं तब्बल ७ कोटींचं आलिशान घर

मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्रीची कमाल! मुंबईत खरेदी केलं तब्बल ७ कोटींचं आलिशान घर

मुंबईत घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेक जण त्यासाठी अपार कष्ट करत असतात. मुंबईत घर घेणं ही सोपी गोष्ट नाही. मायानगरीतील घराच्या गगनाला भिडलेल्या किमती पाहता अनेकांचं हे स्वप्न अपूर्णच राहतं. मात्र एका मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घर घेण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनेत्रीने मुंबईत तब्बल ७ कोटींचं घर खरेदी केलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तेजस्वी प्रकाश आहे. 

तेजस्वी प्रकाशने नुकतंच मुंबईत तिचं ड्रीम होम खरेदी केलं आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातील एका बिल्डिंगमध्ये तेजस्वीने १४व्या मजल्यावर लक्झरियस अपार्टमेंट खरेदी केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग असून १६ फेब्रुवारीला तेजस्वीने यासाठी रेजिस्ट्रेशन केलं. या घराची किंमत ७.६३ कोटी असून त्यासाठी ३८ लाख रुपये स्टँप ड्युटी भरली आहे. तेजस्वीने एका मुलाखतीत रियल इस्टेट आणि प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवत असल्याचं म्हटलं होतं. 


तेजस्वी हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. ससुराल सिमर का, नागिन, सिलसिला बदलते रिश्तो का, कर्ण संगिनी यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मन कस्तुरी रे या मराठी सिनेमामध्येही ती दिसली होती. सध्या ती लाफ्टर शेफमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोच्या एका एपिसोडसाठी तेजस्वी २-३ लाख रुपये फी घेते. तर तिचे नेटवर्थ २० कोटी इतकं आहे. तेजस्वी अभिनेता करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये असून ते दोघंही लिव्ह इनमध्ये राहतात. 

Web Title : मराठी टीवी अभिनेत्री ने मुंबई में खरीदा 7 करोड़ का आलीशान घर!

Web Summary : मराठी टीवी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ने मुंबई के बांद्रा में 7 करोड़ रुपये का आलीशान अपार्टमेंट खरीदा। उन्होंने फरवरी में निर्माणाधीन संपत्ति का पंजीकरण कराया, जिसके लिए 38 लाख रुपये की स्टाम्प ड्यूटी का भुगतान किया। तेजस्वी रियल एस्टेट में भी निवेश करती हैं और करण कुंद्रा के साथ रहती हैं।

Web Title : Marathi TV Actress Buys Luxurious ₹7 Crore Home in Mumbai!

Web Summary : Tejasswi Prakash, a Marathi TV actress, fulfilled her dream by purchasing a ₹7 crore luxurious apartment in Bandra, Mumbai. She registered the under-construction property in February, paying ₹38 lakh in stamp duty. Tejasswi also invests in real estate and lives with Karan Kundra.