"मी घरी एकटी होते अन् एक माणूस...", मराठी अभिनेत्रीला आलेला धक्कादायक अनुभव, काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 10:34 IST2026-03-18T10:20:28+5:302026-03-18T10:34:51+5:30

"मी घरी असताना बाल्कनीमधून एक माणूस...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो'भीतीदायक प्रसंग

tv actress tejasswi prakash share shocking incident a stalker enter in her house when she was alone | "मी घरी एकटी होते अन् एक माणूस...", मराठी अभिनेत्रीला आलेला धक्कादायक अनुभव, काय घडलं होतं?

"मी घरी एकटी होते अन् एक माणूस...", मराठी अभिनेत्रीला आलेला धक्कादायक अनुभव, काय घडलं होतं?

Tejasswi Prakash: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री, बिग बॉस सीझन १५ ची विजेती तेजस्वी प्रकाश कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.तेजस्वी प्रकाश हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.तिने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये मुख्य नायिकांची भूमिका साकारली आहे.तेजस्वी प्रकाशने सध्या 'सायको सैयाँ' या शोमुळे चर्चेत आहे.  या शोच्या माध्यमातून तिने ओटीटीवर पदार्पण केलं आहे.  याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला एका भयावह घटनेबद्दल सांगितलं आहे.

तेजस्वी प्रकाशने अलिकडेच 'न्यूज 18  शोशा'ला मुलाखत दिली.यादरम्यान,तिने एक धक्कादायक अनुभ शेअर केला. एका अज्ञात व्यक्तीने तिचा पाठलाग करत  घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता, असा खुलासा तिने यावेळी केला. त्या घटनेबद्दल बोलताना तेजस्वी म्हणाली,"एक माणूस रोज माझ्या घरी येत असे. मी एका 'रो-हाऊस'मध्ये राहते, त्यामुळे तिथे एक अंगण आहे, तो माणूस त्या ठिकाणी पत्रे ठेवून जायचा. जेव्हा जेव्हा मी घराबाहेर पडायचे, तेव्हा मला ती पत्रं दिसायची आणि 'हा कोण असावा?' असा प्रश्न मला पडायचा. त्यानंतर मग आम्ही घरात कॅमेरे बसवून घेतले होते, पण तरीही तो व्यक्ती कोण होता. हे आम्हाला समजलं नाही."

त्यानंतर पुढे अभिनेत्रीने सांगितलं,"एके दिवशी मी घरी एकटी असताना तो माणूस थेट बाल्कनीतून आत शिरला. सुदैवाने त्याचवेळी माझी आई आणि ड्रायव्हर तिथे आले आणि त्यांनी त्याला बाल्कनीतच पकडले. करणने त्याला हँडल केलं आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं." असा खुलासा अभिनेत्रीने केला. 

तेजस्वी प्रकाश खऱ्या आयुष्यात करण कुंद्राला डेट करत आहे. दोघंही बिग बॉसमध्ये एकत्र होते तेव्हापासून ते डेट करत आहेत. करण आणि तेजस्वीमध्ये ८ वर्षांचं अंतर आहे. तसंच करणचे याआधी अनेक अफेअर्स चर्चेत होते ज्यामुळे तो सतत ट्रोल झाला आहे.

Web Title: tv actress tejasswi prakash share shocking incident a stalker enter in her house when she was alone