टीव्ही अभिनेत्रीची सूरज बडजात्यांच्या सिनेमात एन्ट्री, कोण आहेत मुख्य कलाकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:45 IST2025-12-31T16:44:55+5:302025-12-31T16:45:40+5:30
कोण आहे ही अभिनेत्री?

टीव्ही अभिनेत्रीची सूरज बडजात्यांच्या सिनेमात एन्ट्री, कोण आहेत मुख्य कलाकार?
टेलिव्हिजनवरील अनेक कलाकार आज बॉलिवूड इंडस्ट्रीत स्थिरावले आहेत. अगदी शाहरुख खानपासून ते आता क्रिस्टल डिसुजा, राधिका मदान या अभिनेत्रीही हिंदी सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहेत. सुशांतसिंह राजपूतचा तर टीव्ह ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास सगळ्यांनीच पाहिला होता. त्याच्या निधनाने मनोरंजनसृष्टी हळहळली होती. दरम्यान आणखी एका टीव्ही अभिनेत्रीला थेट बॉलिवूडमध्ये सूरज बडजात्यांच्या सिनेमात झळकण्याची संधी मिळाली आहे.
'शगुन' या मालिकेत दिसलेली अभिनेत्री सुरभी तिवारी बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यावरुन गायब आहे. 'श्री गणेश', 'कुमकुम','दिया बातमी और हम' या मालिकांमध्येही ती दिसली. आता सुरभीला चक्क सुरज बडजात्यांच्या सिनेमाची ऑफर आली आहे. 'ये प्रेम मोल लिया' सिनेमासाठी सुरभीला विचारणा झाली आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना, शर्वरी वाघ, सीमा पाहवा, सुप्रिया पाठक, अनुपम खेर, मोहनीश बहल हे कलाकार दिसणार आहेत.
सूरज बडजात्यांचा सिनेमा म्हणजे कौटुंबिक कहाणीवर आधारित असतो. त्यांचे आतापर्यंतचे सगळेच सिनेमे गाजले. आता सुरभीला त्यांच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याने तिने आनंद व्यक्त केला आहे. सुरभीला शेवटचं 'एक रिश्ता हो साझेदारी का' मध्ये पाहिलं गेलं होतं. सुरभीला खऱ्या आयुष्यात कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. त्यावर तिने काही वर्षांपूर्वीच प्रतिक्रियाही दिली होती. आता ती पुन्हा इंडस्ट्रीत काम करण्यासाठी प्रयत्न करत आहे.