७ महिन्याची गरोदर अन् पार्टीत बिनधास्त डान्स, टीव्ही अभिनेत्रीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 15:35 IST2024-11-13T15:34:11+5:302024-11-13T15:35:04+5:30

श्रद्धाने काही महिन्यांपूर्वीच आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. नुकतंच श्रद्धाच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला.

tv actress shraddha arya pregnant dances in birthday party video goes viral | ७ महिन्याची गरोदर अन् पार्टीत बिनधास्त डान्स, टीव्ही अभिनेत्रीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

७ महिन्याची गरोदर अन् पार्टीत बिनधास्त डान्स, टीव्ही अभिनेत्रीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

श्रद्धा आर्या हे हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे. 'मै लक्ष्मी तेरे आंगन की' मालिकेतून पदार्पण केलेल्या श्रद्धाने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 'कुंडली भाग्य' या मालिकेमुळे श्रद्धा प्रसिद्धीझोतात आली. श्रद्धाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. श्रद्धाने काही महिन्यांपूर्वीच आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. नुकतंच श्रद्धाच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला.

बेबी शॉवर कार्यक्रमातील काही फोटो आणि व्हिडिओ श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. डोहाळेजेवणानंतर अभिनेत्रीचा एका बर्थडे पार्टीतील व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ७ महिन्यांची गरोदर श्रद्धा ठुमके लगावताना दिसत आहे. बर्थडे पार्टीसाठी श्रद्धा आर्याने खास पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. या व्हिडिओत ती डान्स करताना दिसत आहे. श्रद्धाचा बेबी बंपही स्पष्ट दिसत आहे. श्रद्धा सध्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे. 


श्रद्धाने 16 नोव्हेंबर 2021 रोजी राहुल नागलसोबत लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात केली होती. राहुलबरोबर लग्न करण्याआधी श्रद्धाचा साखरपुडा मोडला होता. श्रद्धाचं एका बिझनेसमनसोबत लग्न ठरलं होतं. साखरपुडाही झाला होता. मात्र त्याने लग्नानंतर श्रद्धाला इंडस्ट्री सोडण्याची अट ठेवली होती जी तिने मान्य केली नाही. त्यानंतर श्रद्धाने राहुलशी लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर ३ वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत. 

Web Title: tv actress shraddha arya pregnant dances in birthday party video goes viral