रुबिनाच्या जुळ्या लेकींना पाहिलंत का? 'छोटी बहू'च्या मुलींची नावंही आहेत फारच खास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 01:38 PM2023-12-27T13:38:54+5:302023-12-27T13:39:58+5:30

रुबिनाने पहिल्यांदाच शेअर केला जुळ्या लेकींचा फोटो, म्हणाली...

tv actress rubina dilaik shared her twins baby photo revealed daughters name | रुबिनाच्या जुळ्या लेकींना पाहिलंत का? 'छोटी बहू'च्या मुलींची नावंही आहेत फारच खास

रुबिनाच्या जुळ्या लेकींना पाहिलंत का? 'छोटी बहू'च्या मुलींची नावंही आहेत फारच खास

२०२३मध्ये अनेक अभिनेत्रींना मातृ्त्वाची देणगी मिळाली. गेल्या काही दिवसांत सेलिब्रिटींनी आई झाल्याची गुडन्यूज दिली. छोट्या पडद्यावरील संस्कारी बहूची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुबिना दिलैकही काही दिवसांपूर्वीच आई झाली. रुबिनाने जुळ्या मुलींना जन्म दिला. आई झाल्यानंतर पहिल्यांदाच रुबिनाने जुळ्या लेकींचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

काही महिन्यांपूर्वी रुबिनाने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. जुळ्या मुलांची आई होणार असल्याचंही रुबिनाने सांगितलं होतं. महिन्याभरापूर्वीच रुबिनाने जुळ्या मुलींना जन्म दिला. आता तिने गोंडस लेकींचा फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने मुलींच्या नावाचाही खुलासा केला आहे. 

रुबिनाने लेकींची झलक फोटोतून दाखवली आहे. 'इधा' आणि 'जीवा' अशी नावं रुबिनाने जुळ्या मुलींची ठेवली आहेत. "हे सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की इधा आणि जीवा या आमच्या लेकी आज एका महिन्याच्या झाल्या. गुरू नानक जयंतीच्या दिवशी आम्हाला आशीर्वाद मिळाला. आमच्या परींसाठी प्रार्थना करा", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

'छोटी बहू' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या रुबिनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. २०१८ साली तिने अभिनव शुक्लाबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ५ वर्षांनी रुबिना आणि अभिनव आईबाबा झाले आहेत. 

Web Title: tv actress rubina dilaik shared her twins baby photo revealed daughters name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.