रुबिना दिलैक होणार जुळ्या मुलांची आई, एका अपघातामुळे लपवून ठेवली होती 'गुडन्यूज'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 09:06 AM2023-11-29T09:06:10+5:302023-11-29T09:07:10+5:30

रुबिना दिलैकने आपल्या प्रेग्नंसीविषयी अनेक खुलासे केले आहेत.

tv actress Rubina Dilaik reveals she is pregnant with twins met with minor road accident | रुबिना दिलैक होणार जुळ्या मुलांची आई, एका अपघातामुळे लपवून ठेवली होती 'गुडन्यूज'

रुबिना दिलैक होणार जुळ्या मुलांची आई, एका अपघातामुळे लपवून ठेवली होती 'गुडन्यूज'

टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) लवकरच आई होणार आहे. सध्या ती गरोदरपणाचे दिवस एन्जॉय करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या प्रेग्नंसीची चर्चा होती. मधल्या काळात तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत यावर शिक्कामोर्तब केला. आता नुकतंच तिने चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे. 

रुबिना दिलैकने आपल्या प्रेग्नंसीविषयी अनेक खुलासे केले आहेत. प्रेग्नंसीदरम्यान येणारे कॉम्प्लिकेशन्सबाबतीतही तिने चर्चा केली. तसंच तिचा मधल्या काळात अपघात झाला. तो क्षण किती कठीण होता याचाही तिने खुलासा केला. एका पॉडकास्टमध्ये रुबिना म्हणाली,'जेव्हा आम्हाला समजलं की मला जुळी मुलं होणार आहेत मी आणि अभिनव शॉक झालो होतो. सुरुवातीचे १२ आठवडे खूप काळजीचे असतात कोणालाही सध्यातरी याबद्दल सांगू नका असं म्हणत डॉक्टरांनी आम्हाला चिंतेत पाडले होते. म्हणून आम्ही ३ महिन्यापर्यंत कोणालाही ही बातमी कळू दिली नव्हती.'

रुबिनाचा झालेला अपघात

रुबिना पुढे म्हणाली, 'तिसऱ्या महिन्यात प्रेग्नंसी स्कॅननंतर जेव्हा मी परत निघाले होते तेव्हा माझ्या गाडीचा छोटा अपघात झाला. जसा गाडीचा ब्रेक लागला आधी मी सीटच्या मागे धडकले आणि नंतर माझं डोकं समोरच्या सीटवर आदळलं. त्याक्षणी मी खूप घाबरले होते आणि माझी मुलं ठीक तर आहेत ना असे प्रश्न पडले. याच कारणाने आम्ही प्रेग्नंसीची बातमी लपवून ठेवली.'

रुबिनाचा हा ९ वा महिना सुरु आहे. लवकरच तिच्या घरी पाळणा हलणार आहे. तेही घरात डबल आनंदाचं वातावरण असणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने केलेलं प्रेग्नंसी फोटोशूट चर्चेत होतं.

Web Title: tv actress Rubina Dilaik reveals she is pregnant with twins met with minor road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.