"मी दुसरीत असताना एका मुलाला प्रपोज केलं होतं", रसिकाचा खुलासा, म्हणाली, "मी त्याला I Love You..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 12:43 IST2023-10-11T12:40:08+5:302023-10-11T12:43:17+5:30

'लोकमत फिल्मी'च्या 'माय फर्स्ट विथ रसिका सुनील'मध्ये तिने अनेक सिक्रेट उघड केली आहेत.

tv actress rasika sunil said she proposed guy in her school in 2nd standard | "मी दुसरीत असताना एका मुलाला प्रपोज केलं होतं", रसिकाचा खुलासा, म्हणाली, "मी त्याला I Love You..."

"मी दुसरीत असताना एका मुलाला प्रपोज केलं होतं", रसिकाचा खुलासा, म्हणाली, "मी त्याला I Love You..."

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. या मालिकेत शनायाची भूमिका साकारून रसिका घराघरात पोहोचली. रसिकाने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे. आता ती 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या नव्या पर्वाचं रसिका सूत्रसंचालन करणार आहे. रसिकाने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. 

'लोकमत फिल्मी'च्या 'माय फर्स्ट विथ रसिका सुनील'मध्ये तिने अनेक सिक्रेट उघड केली. यामध्ये तिला पहिलं प्रपोज कोणाला केलं होतं? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत ती म्हणाली, "मी पहिल्यांदा दुसरी-तिसरीत असताना एका मुलाला प्रपोज केलं होतं. मला त्या मुलाचं नाव आठवत नाहीये. पण, मी त्या मुलाला खोडरबरवर I Love You लिहून पाठवलं होतं." या खास मुलाखतीत रसिकाने तिचा फेव्हरेट सेलिब्रिटी क्रश कोण? हेदेखील सांगितलं. प्रसिद्ध गायक सोनू निगम क्रश असल्याचं रसिका म्हणाली. 

रसिकाने 'बस स्टॉप', 'पोश्टर गर्ल', 'बघतोस काय मुजरा कर', 'गर्लफ्रेंड' या चित्रपटांत काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'फकाट' चित्रपटात ती झळकली होती. रसिकाचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. रसिकाने २०२१मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. 

Web Title: tv actress rasika sunil said she proposed guy in her school in 2nd standard