अविवाहित असूनही भांगात कुंकू का भरते अभिनेत्री? खुलासा करत म्हणाली- "माझं लग्न झालं नसलं तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 12:39 IST2024-11-08T12:39:03+5:302024-11-08T12:39:58+5:30

पवित्रा नक्की कोणाच्या नावाचं कुंकू ती भांगात भरते, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम होता. अखेर अभिनेत्री चाहत्यांच्या मनातील हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पवित्रा पुनियाने एक व्हिडिओ शेअर भांगात कुंकू लावण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. 

tv actress pavitra puniya revealed why she put sindoor even if not married | अविवाहित असूनही भांगात कुंकू का भरते अभिनेत्री? खुलासा करत म्हणाली- "माझं लग्न झालं नसलं तरी..."

अविवाहित असूनही भांगात कुंकू का भरते अभिनेत्री? खुलासा करत म्हणाली- "माझं लग्न झालं नसलं तरी..."

टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच पवित्रा पुनिया आणि अभिनेता एजाज खान यांचं ब्रेकअप झालं. त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीमुळे चाहत्यांनाही धक्का बसला होता. एजाज खानशी ब्रेकअप झाल्यानंतर पवित्रा पुनिया भांगात कुंकू लावताना दिसून आली. त्यामुळे पवित्रा पुनियाने लग्न केलं की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. अखेर पवित्राने भांगात कुंकू लावण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. 

एजाज खानशी ब्रेकअपनंतर अवघ्या काही महिन्यांतर पवित्राने लग्न करून संसार थाटला की काय? असा प्रश्न तिच्या भांगातील कुंकू पाहून चाहत्यांना पडला होता. पण, पवित्राचं लग्न झालं नसल्याचं समोर आलं. त्यामुळे पवित्रा नक्की कोणाच्या नावाचं कुंकू ती भांगात भरते, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम होता. अखेर अभिनेत्री चाहत्यांच्या मनातील हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पवित्रा पुनियाने एक व्हिडिओ शेअर भांगात कुंकू लावण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. 

"मी भांगात भरत असलेल्या कुंकूवाची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. लोकांना असं वाटतंय की मी लग्न केलंय. मी अजून लग्न केलेलं नाही. पण, हे कुंकू मी धार्मिकता म्हणून लावत आहे. याचा माझ्या लग्नाशी काहीही संबंध नाही. जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा संपू्र्ण जगाला माहीत पडेल, की माझं लग्न झालंय. तोपर्यंत कृपया शांत राहा. आणि मला त्रास देऊ नका", असं पवित्रा पुनिया या व्हिडिओत म्हणत आहे. 


पवित्रा पुनिया आणि एजाज खान काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. २०२२ मध्ये त्यांनी साखरपुडाही केला होता. पण, काही कारणांमुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

Web Title: tv actress pavitra puniya revealed why she put sindoor even if not married