"सेटवर त्रास दिला जातो आणि पैसे...", निया शर्माने सांगितली पडद्यामागची काळी बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 11:53 IST2024-06-17T11:52:56+5:302024-06-17T11:53:16+5:30

४ वर्षांनंतर आता पुन्हा निया 'सुहानग चुडैल' या हॉरर मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका मुलाखतीत मालिकांपासून दूर राहण्याचं कारण तिने सांगितलं आहे.

tv actress nia sharma talk abput toxic enviorment and harrassment on serials sets | "सेटवर त्रास दिला जातो आणि पैसे...", निया शर्माने सांगितली पडद्यामागची काळी बाजू

"सेटवर त्रास दिला जातो आणि पैसे...", निया शर्माने सांगितली पडद्यामागची काळी बाजू

निया शर्मा हा टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. संस्कारी बहू ते बोल्ड अभिनेत्री अशी ओळख बनवलेल्या नियाने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 'एक हजारो में मेरी बहना है', 'जमाई राजा', 'नागिन ४' अशा सुपरहिट मालिकांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. पण, गेल्या काही वर्षांपासून निया मालिकाविश्वापासून दूर होती. टीव्हीवरील अनेक रिएलिटी शोमध्ये निया झळकली, पण ती मालिकेत दिसली नाही. अखेर यामागचं कारण तिने सांगतिलं आहे. 

४ वर्षांनंतर आता पुन्हा निया 'सुहानग चुडैल' या हॉरर मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'नागिन ४' मालिकेनंतर नियाने पुन्हा मालिकाविश्वात कमबॅक केलं आहे. यादरम्यान निया 'खतरों के खिलाडी', 'झलक दिखलाजा १०' या रिएलिटी शोमध्ये दिसली होती. पण, मालिकांपासून तिने दूर राहणंच पसंत केलं. याबाबत एका मुलाखतीत तिने भाष्य केलं आहे. निया म्हणाली, "मालिका न करण्याचा निर्णय मी खूप विचारपूर्वक घेतला होता. मी ज्या मालिकांमध्ये काम केलं त्या मालिका अनेक वर्ष चालल्या. मालिका सुरू होताच काहीच दिवसांत बंद पडली, असं होता कामा नये. त्या मालिकेबद्दल लोकांना माहितच नव्हतं, असं झालं नाही पाहिजे या मताची मी आहे". 

"म्हणून मी गेल्या काही वर्षांत मालिकांमध्ये काम केलं नाही. मला ज्या मालिकांसाठी विचारण्यात आलं होतं. त्या सगळ्या मालिका तीन महिन्यांतच बंद झाल्या. त्यामुळे या मालिकांच्या ऑफर न स्वीकारल्याचं मला वाईट वाटलं नाही," असं निया पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. पुढे तिने टीव्ही इंडस्ट्रीची पडद्यामागची काळी बाजूदेखील सांगितली. 

निया म्हणाली, "मालिकाविश्वात अनेक तास काम करावं लागतं. पैसे वेळेवर मिळत नाहीत. सेटवर त्रास दिला जातो. आणि टॉक्झिक वातावरण असतं. पण, हे आपण बदलू शकत नाही. कारण, डेली सोपसाठी ते प्रत्येक दिवसांचं कॉन्ट्र्रॅक्ट करतात. आणि सगळ्याच कलाकारांना हे माहीत आहे". 

Web Title: tv actress nia sharma talk abput toxic enviorment and harrassment on serials sets