मयुरी वाघची नवी सुरुवात! अभिनेत्रीने खरेदी केलं स्वत:चं घर, म्हणाली, "माझं स्वप्न..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 09:07 IST2023-12-08T09:06:41+5:302023-12-08T09:07:58+5:30

मयुरीने नुकतंच नवीन घर खरेदी केलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर नवीन घराचे काही फोटोही शेअर केले आहेत.

tv actress mayuri wagh buys new home shared photos on social media | मयुरी वाघची नवी सुरुवात! अभिनेत्रीने खरेदी केलं स्वत:चं घर, म्हणाली, "माझं स्वप्न..."

मयुरी वाघची नवी सुरुवात! अभिनेत्रीने खरेदी केलं स्वत:चं घर, म्हणाली, "माझं स्वप्न..."

'अस्मिता' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी वाघ. अभिनयाच्या जोरावर मयुरीने मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारत तिने अभिनयाचा ठसा उमटवला. मयुरी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्याबाबतही मयुरी पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असते. 

मयुरीने नुकतंच नवीन घर खरेदी केलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर नवीन घराचे काही फोटोही शेअर केले आहेत. नव्या घराच्या वास्तुशांतीचे फोटो शेअर करत मयुरीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. "माझ्या बकेट लिस्टमधली आणखी एक गोष्ट पूर्ण झाली. माझं स्वप्न घराच्या पत्त्यामध्ये रुपांतरित झालं आहे," असं मयुरीने म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, 'अस्मिता' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या मयुरीने 'ती फुलराणी', 'आशीर्वाद तुझा एकविरा आई' या मालिकांमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. तिने २०१७ साली अभिनेता पियुष रानडेबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. परंतु, काही कारणांमुळे लग्नानंतर काहीच वर्षांत ते घटस्फोट घेत वेगळे झाले. पियुषचं मयुरीबरोबर हे दुसरं लग्न होतं. नुकतीच त्याने अभिनेत्री सुरुची अडारकरबरोबर पुन्हा लग्नगाठ बांधली आहे.

Web Title: tv actress mayuri wagh buys new home shared photos on social media