ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये दिसल्या मेलेल्या मुंग्या, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीसोबत किळसवाणा प्रकार, शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:58 IST2025-10-07T16:58:09+5:302025-10-07T16:58:38+5:30
अभिनेत्री माही विजच्या मुलीने ऑनलाइन अॅपवरुन आईस्क्रीम ऑर्डर केलं होतं. मात्र तिने मागवलेल्या आईस्क्रीममध्ये मेलेल्या मुंग्या सापडल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन व्हिडीओ शेअर करत हा प्रकार उघडकीस आणला आहे.

ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये दिसल्या मेलेल्या मुंग्या, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीसोबत किळसवाणा प्रकार, शेअर केला व्हिडीओ
अनेकदा ऑनलाइन मागवलेल्या वस्तूंमध्ये ग्राहकांची फसवणूक केली जाते. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीसोबतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. अभिनेत्री माही विजच्या मुलीने ऑनलाइन अॅपवरुन आईस्क्रीम ऑर्डर केलं होतं. मात्र तिने मागवलेल्या आईस्क्रीममध्ये मेलेल्या मुंग्या सापडल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन व्हिडीओ शेअर करत हा प्रकार उघडकीस आणला आहे.
माही विजने तिची दत्तक लेक खुशीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत खुशी म्हणते, "मित्रांनो मी ब्लिंक इटवरून कसाटा आईस्क्रीम ऑर्डर केले. या आईस्क्रीमचा बॉक्स आधीपासूनच थोडा उघडलेला होता. तसेच त्याच्या आतमध्ये थोडा चिखलही लागलेला होता. जेव्हा मी हा आईस्क्रीमचा बॉक्स पूर्ण उघडला तेव्हा मला त्या आईस्क्रीमवर मेलेल्या मुंग्या लागल्याचं दिसलं. ब्लिंक इट तुम्ही ग्राहकांना अशी सेवा नाही दिली पाहिजे. हे खरंच खूप वाईट आहे".
"हा नफ्याचा नाही तर विश्वासाचा प्रश्न आहे. मुलीसाठी आईस्क्रीम ऑर्डर केलं होतं. चिखल लागलेला उघडलेला बॉक्स आणि त्याला मुंग्या लागल्या होत्या. ब्लिंकइट ही फक्त वाईट सेवा नाही तर सुरक्षिततेचा प्रश्न आहे. कोणाचं तरी नुकसान होण्याआधी याची जबाबदारी घ्या", असं म्हणत माहीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्यांचे अनुभवही सांगितले आहेत.