खुशबू तावडेने पहिल्यांदाच शेअर केला लाडक्या लेकीचा फोटो, नावही ठेवलंय खूपच खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 11:33 IST2024-10-17T11:33:04+5:302024-10-17T11:33:34+5:30

पहिल्यांदाच लेकीबरोबरचा फोटो खुशबूने शेअर केला आहे. फोटो शेअर करत खुशबूने तिच्या लेकीच्या नावाचाही खुलासा केला आहे. 

tv actress khushboo tawade shared her little baby girl photo revealed 2nd child name | खुशबू तावडेने पहिल्यांदाच शेअर केला लाडक्या लेकीचा फोटो, नावही ठेवलंय खूपच खास

खुशबू तावडेने पहिल्यांदाच शेअर केला लाडक्या लेकीचा फोटो, नावही ठेवलंय खूपच खास

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री खुशबू तावडे काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली. २ ऑक्टोबरला खुशबूने गोंडस लेकीला जन्म दिला होता. सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज तिने चाहत्यांना दिली होती. आता पहिल्यांदाच लेकीबरोबरचा फोटो खुशबूने शेअर केला आहे. फोटो शेअर करत खुशबूने तिच्या लेकीच्या नावाचाही खुलासा केला आहे. 

खुशबू तावडेने तिच्या इन्स्टाग्रामवरुन फॅमिली फोटो शेअर केला आहे. यामध्ये फोटोमध्ये तिने लेकीची झलक दाखवली आहे. खुशबू, पती संग्राम साळवी यांच्याबरोबर त्यांचा मुलगा आणि लेकही दिसत आहे. हा गोड फोटो शेअर करत खुशबूने लेकीचं नाव काय ठेवलंय तेदेखील सांगितलं आहे. खुशबू आणि संग्रामने आपल्या लाडक्या लेकीचं नाव 'राधी' असं ठेवलं आहे. 


खुशबू आणि संग्राम साळवीने २०१८ साली लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर ३ वर्षांनी खुशबूने राघव या त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. नोव्हेंबर २०२१ मध्ये खुशबूला पुत्ररत्न झालं. तर आता खुशबू आणि संग्राम दुसऱ्यांदा आईबाबा झाले आहेत. खुशबू शेवटची सारं काही तिच्यासाठी मालिकेत दिसली होती. या मालिकेच्या शूटिंगदरम्यानच ती गरोदर होती. गरोदर असतानाही सातव्या महिन्यापर्यंत खुशबूने मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर तिने मालिकेतून एक्झिट घेतली होती. 
 

Web Title: tv actress khushboo tawade shared her little baby girl photo revealed 2nd child name