मला पुरूषाची गरज नाही...! ‘या’ अभिनेत्रीनं स्वत:शीच थाटलं लग्न, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 12:11 IST2022-08-17T12:07:19+5:302022-08-17T12:11:36+5:30

Diya Aur Baati Hum Fame Actress Kanishka Soni: होय, टीव्ही अभिनेत्री कनिष्का सोनीने स्वत:शीच लग्न केलंय. वाचून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. मला कोणत्याही पुरूषाची गरज नाही, असं म्हणत तिने स्वत:च स्वत:शी लग्न केलं.

tv Actress Kanishka Soni marries herself shares pics in mangalsutra |  मला पुरूषाची गरज नाही...! ‘या’ अभिनेत्रीनं स्वत:शीच थाटलं लग्न, शेअर केले फोटो

 मला पुरूषाची गरज नाही...! ‘या’ अभिनेत्रीनं स्वत:शीच थाटलं लग्न, शेअर केले फोटो

काळ बदलला तसा लग्न आणि नात्यांबद्दलचे लोकांचे विचारही बदलू लागले आहेत. आजच्या युगात अनेक मुलींना लग्न नावाची गोष्ट नकोय. आता या टीव्ही अभिनेत्रीचेच उदाहरण घ्या. होय, टीव्ही अभिनेत्री कनिष्का सोनीने (Kanishka Soni) स्वत:शीच लग्न केलंय. वाचून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. मला कोणत्याही पुरूषाची गरज नाही, असं म्हणत तिने स्वत:च स्वत:शी लग्न केलं.

कनिष्का सोनीने आपले काही खास फोटो शेअर केले आहेत. यात तिच्या भांगेत कुंकू आहे. गळ्यात मंगळसूत्र आहे. तिचे हे फोटो पाहून आधी सगळेच हैराण झालेत. पण मग या फोटोंना कनिष्काने दिलेलं कॅप्शन वाचून लोकांना खरं काय ते कळंल.

‘मी स्वत: स्वत:शीच लग्न केलं आहे. मी माझी सगळी स्वप्नं स्वत: एकटीने पूर्ण केली आहेत. मी ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहे, ती मी स्वत: आहे. मला कुठल्याही पुरूषाची गरज नाही. माझी गिटार आणि माझं एकाकीपण यासोबत मी आनंदी आहे. मी देवी आहे. मी खंबीर व शक्तिशाली आहे. शिव आणि शक्ती सगळं काही माझ्या आत आहे..,’ असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
सध्या कनिष्काच्या याच लग्नाची चर्चा आहे. सोशल मीडियावर तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे.

कनिष्का सोनीने दीया और बाती, पवित्र रिश्ता, देवी आदी पराशक्ती अशा हिट टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. दीया और बाती आणि पवित्र रिश्ता या मालिका प्रचंड गाजल्या. लोकांनी या मालिकांना डोक्यावर घेतलं. या मालिकेत कनिष्का महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. लवकरच कनिष्का हॉलिवूड डेब्यू करणार आहे. हॉलिवूड डेब्यूसाठी तिने टीव्ही इंडस्ट्रीला रामराम ठोकला आहे.

Web Title: tv Actress Kanishka Soni marries herself shares pics in mangalsutra