Kasautii Zindagii Kay 2 : हिना खान आऊट; एकता कपूरला सापडली नवी कोमोलिका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 13:32 IST2019-09-08T13:32:02+5:302019-09-08T13:32:58+5:30
होय, ताजी खबर खरी मानाल तर ‘कसौटी जिंदगी के 2’ साठी एकताला आणखी दुसरी नवी कोमोलिका सापडली आहे.

Kasautii Zindagii Kay 2 : हिना खान आऊट; एकता कपूरला सापडली नवी कोमोलिका!
एकता कपूरने ‘कसौटी जिंदगी के’चे दुसरे सीझन आणण्याची घोषणा करताच चाहत्यांच्या मनात पहिला प्रश्न कुठला आला असेल तर तो म्हणजे, नवी कोमोलिका कोण बनणार? पहिल्या सीझनमध्ये उर्वशी ढोलकियाने कोमोलिकाची भूमिका साकारली होती. ही भूमिका इतकी हिट झाली होती की, तिच्याच तोडीची अभिनेत्री शोधताना एकताला बरेच कष्ट पडलेत. अखेर या भूमिकेसाठी हिना खानचे नाव समोर आले आणि एकताला नवी कोमोलिका मिळाली.
हिना कोमोलिका बनून पडद्यावर आली आणि पहिल्याच एपिसोडमध्ये तिने स्वत:ची छाप सोडली. जुन्या कोमोलिकाला विसरून प्रेक्षक नव्या कोमोलिकाच्या प्रेमात पडले. पण काहीच महिन्यानंतर हिना ‘कसौटी जिंदगी के 2’ सोडणार अशी बातमी आली आणि प्रेक्षकांची निराशा झाली. ही बातमी खरी ठरली आणि हिना ‘कसौटी जिंदगी के 2’मधून गायब झाली. आता तर ती ‘कसौटी जिंदगी के 2’ मधून नेहमीसाठी आऊट झाली आहे. होय, ताजी खबर खरी मानाल तर ‘कसौटी जिंदगी के 2’ साठी एकताला आणखी दुसरी नवी कोमोलिका सापडली आहे.
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, कोमोलिका लवकरच शोमध्ये वापसी करणार आहे. हिना खान आऊट झाल्यानंतर तिची जागा कोण घेणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तिचे नाव आहे, जास्मिन भसीन.
होय, आधी या भूमिकेसाठी रागिणी खन्ना, मधुरिमा तुली, रिद्धी डोगरा, दिशा परमार, सान्या इराणी अशा अनेकींची नावे चर्चेत होती. यापैकी एकताला सान्या इराणी जाम आवडली होती. पण तिने नकारात्मक भूमिकेसाठी नकार दिला होता. तिने नकार दिल्यानंतर एकताने जास्मिन भसीनची निवड केली आहे. अर्थात अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.