मराठी अभिनेत्रीसमोर करीनाही फेल! 'झुबी डुबी' गाण्यावरील डान्स पाहून नेटकरी करत आहेत कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 11:52 IST2024-07-08T11:52:13+5:302024-07-08T11:52:31+5:30

जान्हवी तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी 'झुबी डुबी' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

tv actress janhavi killekar dance on zubi dubi song netizens compare her with kareena kapoor | मराठी अभिनेत्रीसमोर करीनाही फेल! 'झुबी डुबी' गाण्यावरील डान्स पाहून नेटकरी करत आहेत कौतुक

मराठी अभिनेत्रीसमोर करीनाही फेल! 'झुबी डुबी' गाण्यावरील डान्स पाहून नेटकरी करत आहेत कौतुक

अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री जान्हवी किल्लेकर घराघरात पोहोचली. जान्हवी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते. अनेकदा जान्हवी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. नुकतंच तिच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

जान्हवी तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी 'झुबी डुबी' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. साडीमध्ये जान्हवीने नदी किनारी या गाण्यावर ठुमके लावले आहेत. छत्री घेऊन जान्हवी या व्हिडिओत डान्स करताना दिसत आहे. डान्समध्ये तिच्या कातिल अदा पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरशी तिची तुलना केली आहे. 

'झुबी डुबी' हे गाणं थ्री इडियट्स या सिनेमातील आहे. या गाण्यात आमिर खान आणि करीना कपूर डान्स करताना दिसतात. 'झुबी डुबी' गाण्यावरील जान्हवीच्या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. "करीना कपूर पण हा व्हिडिओ पाहून लाजेल", "विषय संपला, लावा ताकद", "हे शूट त्या पिक्चरमध्ये एडिट करून टाकायला हवं", "खूप छान" अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 

दरम्यान, जान्हवीने मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. स्वामी समर्थ, आई माझी काळूबाई, भाग्य दिले तू मला या मलिकांमध्ये की महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. काही दिवसांपूर्वीच जान्हवीच्या फार्म हाऊसवर चोरी झाली होती. चोरीच्या धक्याने जान्हवीच्या आईला पॅरालिसीस अटॅक आला होता. आता तिच्या आईची प्रकृती स्थिर असल्याचं तिनं म्हटलं आहे. 
 

Web Title: tv actress janhavi killekar dance on zubi dubi song netizens compare her with kareena kapoor