लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान मर्सिडीज कार, किंमत आहे तब्बल 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 13:44 IST2024-12-22T13:44:43+5:302024-12-22T13:44:58+5:30

गौहर खानने नवी कोरी मर्सिडीज कार खरेदी केली आहे. तिने पांढऱ्या रंगाची Mercedes-Benz C-Coupe ही आलिशान गाडी खरेदी केली आहे.

tv actress gauhar khan buys mercedes car worth of rs 1cr | लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान मर्सिडीज कार, किंमत आहे तब्बल 'इतके' कोटी

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान मर्सिडीज कार, किंमत आहे तब्बल 'इतके' कोटी

गौहर खान ही हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. गौहर खानचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच तिने चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. गौहर खानने नवी कोरी मर्सिडीज कार खरेदी केली आहे. 

तिने पांढऱ्या रंगाची Mercedes-Benz C-Coupe ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. गाडी खरेदी करण्यासाठी गौहर खान तिच्या कुटुंबीयांसोबत गेली होती. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मर्सिडीज या ब्रँडच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. अभिनेत्रीने घेतलेल्या या आलिशान गाडीची किंमत १ कोटींच्या घरात आहे. 


गौहर खान आलिशान गाड्यांची शौकीन आहे. तिच्याकडे Mercedes-Benz E-Class, ऑडी Q7 आणि ए-लिमोजीन या महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. दरम्यान, तिने मालिकांबरोबरच सिनेमातही काम केलं आहे. 'बिग बॉस ७' या रिएलिटी शोची ती विनर होती. 

Web Title: tv actress gauhar khan buys mercedes car worth of rs 1cr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.