या ‘संस्कारी बहूं’नी प्रेक्षकांना दिला आश्चर्याचा धक्का; टीव्हीवर रूजवला बोल्ड सीन्सचा ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 08:00 IST2020-01-12T08:00:00+5:302020-01-12T08:00:02+5:30

काही बोल्ड टीव्ही अभिनेत्रींबद्दल...

tv actress boldness intimate scenes viral shweta tiwari sakshi tanwar |  या ‘संस्कारी बहूं’नी प्रेक्षकांना दिला आश्चर्याचा धक्का; टीव्हीवर रूजवला बोल्ड सीन्सचा ट्रेंड

 या ‘संस्कारी बहूं’नी प्रेक्षकांना दिला आश्चर्याचा धक्का; टीव्हीवर रूजवला बोल्ड सीन्सचा ट्रेंड

ठळक मुद्दे‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेत साक्षीने राम कपूरसोबत लव्ह मेकिंग सीन्स दिले होते. तिच्या या सीन्सची दीर्घकाळ चर्चा होती.

सासू-सुनेच्या नात्यावर आधारित मालिकांमध्ये संस्कारी सुनेच्या भूमिका साकारणा-या नट्या अचानक बोल्ड अवतारात समोर येतात तेव्हा चाहत्यांना धक्का बसतोच. मग ती साक्षी तन्वर असो वा श्वेता तिवारी. टीव्हीवर बोल्ड सीन्सचा ट्रेंड सुरु करण्याचे श्रेय या अभिनेत्रींना जाते. आज अशाच  काही बोल्ड अभिनेत्रींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

श्वेता तिवारी

अलीकडे श्वेता तिवारीचा बोल्ड अंदाज चर्चेचा विषय ठरला होता. होय, ‘हम तुम और देम’ या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. या ट्रेलरमध्ये श्वेता कधी नव्हे इतक्या बोल्ड अवतारात दिसली. को-स्टार अक्षय ओबेरॉयसोबत श्वेताने यात अनेक किसींग व इंटिमेट सीन्स दिलेत. त्याआधी ‘कसौटी जिंदगी के’ या एकताच्या मालिकेत तिने रोहित रॉयसोबत इंटिमेट सीन दिले होते.

साक्षी तन्वर

संस्कारी सूनेची प्रतिमा जपणा-या साक्षी तन्वरने एका मालिकेत बोल्ड सीन्स देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. होय, ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेत साक्षीने राम कपूरसोबत लव्ह मेकिंग सीन्स दिले होते. तिच्या या सीन्सची दीर्घकाळ चर्चा होती.

शमा सिकंदर

शमा सिकंदर तिच्या बोल्ड इमेजसाठी ओळखली जाते. ‘माया’ या वेबसीरिजमध्ये तिने अतिशय बोल्ड लव्ह मेकिंग सीन्स दिले होते.

निया शर्मा

रिअल लाईफमध्ये ग्लॅमरस अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. ‘twisted’ या विक्रम भट यांच्या वेबसीरिजमध्ये तिने फिमेल अ‍ॅक्ट्रेससोबत लिपलॉक सीन्स देऊन सगळ्यांना मोठा धक्का दिला होता.

बरखा बिस्ट

बरखाने ‘नामकरण’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील बरखाच्या लव्ह मेकिंग सीन्सची भरपूर चर्चा झाली होती. हे सीन्स टेलिव्हिजनचे सर्वाधिक बोल्ड सीन्स ठरले होते.

संजीदा शेख

विक्रम भटच्या ‘गहराईयां’ या वेबसीरिजमध्ये को-अ‍ॅक्टरसोबत प्रचंड बोल्ड सीन्स देऊन संजीदा चर्चेत आली होती.

Web Title: tv actress boldness intimate scenes viral shweta tiwari sakshi tanwar