फॅमिली वेडींगमध्ये टीव्ही अॅक्ट्रेस अंकिता भार्गवची धम्माल मस्ती,SEE PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 12:40 IST2018-01-24T07:00:35+5:302018-01-24T12:40:23+5:30
आपले लाडके कलाकार शूटिंगशिवाय ऑफस्क्रीन काय काय करतात हे जाणून घेण्यात रसिकांना बरीच उत्सुकता असते.आज आम्ही अशी एक अपडेट ...

फॅमिली वेडींगमध्ये टीव्ही अॅक्ट्रेस अंकिता भार्गवची धम्माल मस्ती,SEE PHOTO
आ ले लाडके कलाकार शूटिंगशिवाय ऑफस्क्रीन काय काय करतात हे जाणून घेण्यात रसिकांना बरीच उत्सुकता असते.आज आम्ही अशी एक अपडेट तुम्हाला देणार आहोत.लग्नसोहळ्यात प्रत्येकालाच धम्माल मस्ती करायला आवडते.त्यामुळे सध्या या बँड बाजाच्या तालावर कलाकार मंडळी मस्त लग्नात हजेरी लावून मजा लुटताना दिसतायेत.त्यामुळे लग्नातील धम्माल काय असते हे प्रत्येकालाच माहिती आहे. हीच धम्माल करण्याची संधी कुणीही सोडत नाहीत.नुकतंच टीव्ही अॅक्ट्रेस अंकिता भार्गव फॅमिली वेडींगमध्ये धम्माल करताना दिसली.यावेळी अंकिता खुप गॉर्जियस दिसत होती.अंकिताच्या नंणदेचे लग्न होते.लग्नसोहळ्यात मजा मस्ती करतानाचे फोटो अंकिताने शेअर केले आहेत.शेअर केलेल्या फोटोत अंकिता कुटुंबासोबत एका लग्नसोहळ्यात वेळ घालवताना दिसत आहे.एरव्ही शूटिंगच्या बिझी शेड्युअलमध्ये कुटुंबासह मजा मस्ती आणि धम्माल करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही.मात्र कुटुंबात होणा-या लग्न सोहळ्यामुळे संपूर्ण कुटुंबासह आणि आपल्या नातेवाईकांना भेटता येते.याचनिमित्ताने गाठीभेटी होतात आणि त्याची मजा काही औरच असते असंही तिने म्हटले आहे.
मुळात अंकिता भार्गव ही अभिनेता करण पटेलची पत्नी आहे.2015मध्ये दोघांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते.करण पटेल हा सध्या 'ये है मोहब्बते' मालिकेत रमण भल्लाही भूमिका साकरत आहे.या मालिकेतील रमण आणि इशिताची जोडी सुपरहिट ठरली होती.आता या मालिकेने लीप घेतला आहे.लीपनंतर या मालिकेच्या कथानकात अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे.'ये है मोहोब्बते' ही मालिका २०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आज इतकी वर्षं होऊनही या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही.ही मालिका बालाजी टेलिफ्लिम्सची असून टिआरपीच्या रेसमध्ये नेहमीच अव्वल राहिलेली आहे.या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा रसिकांना खूप आवडतात.पण त्यातही इशिताची भूमिका साकारणारी दिव्यांका त्रिपाठी ही रसिकांची प्रचंड लाडकी बनली आहे.आता दिव्यांका रसिकांना 'ये है मोहोब्बते' या मालिकेत एका वेगळ्या रूपात पाहायला मिळत आहे.या मालिकेतील तिचा नवा लूक हा खूप वेगळा असून तिच्या लूकवर मालिकेच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे.