#RavideserveAward टीव्ही अभिनेता रवी दुबे अचानक ट्विटरवर ट्रेंड, रवीला अवॉर्ड मिळणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 18:18 IST2022-11-08T18:16:55+5:302022-11-08T18:18:09+5:30

आज रवी दुबे अचानक ट्विटरवर ट्रेंड का झाला? ट्विटरवर हे काय सुरु आहे बघून रवी सुद्धा अवाक झालाय.

tv-actor-ravi-dubey-suddenly-gets-trend-on-twitter-is-ravi-getting-an-award | #RavideserveAward टीव्ही अभिनेता रवी दुबे अचानक ट्विटरवर ट्रेंड, रवीला अवॉर्ड मिळणार ?

#RavideserveAward टीव्ही अभिनेता रवी दुबे अचानक ट्विटरवर ट्रेंड, रवीला अवॉर्ड मिळणार ?

टीव्ही अभिनेता रवी दुबेची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अतिशय अल्पावधित त्याने टेलिव्हिजन क्षेत्रात यश कमावले आहे. सिरिअल असो किंवा सूत्रसंचालन रवी आपली छाप पाडतोच. सोशल मीडियावरही तो कमालीचा अॅक्टिव्ह आहे. त्याचे फॅन्स सतत त्याच्या पोस्टवर भरभरुन कमेंट करत असतात. पण आज रवी दुबे अचानक ट्विटरवर ट्रेंड का झाला? #RavideserveAward असा हॅशटॅग आज सकाळी चांगलाच ट्रेंडिंग झाला. 

ट्विटरवर हे काय सुरु आहे बघून रवी सुद्धा अवाक झाला. यानंतर त्याने माहिती घेतली तेव्हा त्याला कळले की, 'माझ्या फॅन्सनेच हे केले आहे. मागील वर्षी रिलीज झालेल्या मत्सकांड या सिरीजसाठी मला अवॉर्ड मिळाला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. मला असे ट्विटरवर ट्रेंड करणे हेच माझ्यासाठी अवॉर्ड पेक्षा कमी नाही. फॅन्सचे हे माझ्यावरील प्रेमच आहे तेच खूप आहे. फॅन्सचे हे प्रेम खरेच कधीकधी मला भावूक करते.'

रवीच्या मते अवॉर्ड्सचे महत्व किती

रवी सांगतो, 'अवॉर्ड्स मिळतील की नाही याने काही फरक पडत नाही असे जर मी म्हणले तर ते खोटे वाटेल. अवॉर्डमुळे आत्मविश्वास मिळतो. तुम्ही योग्य मार्गावर आहात याची जाणीव होते. माझ्यासाठी अवॉर्डचे महत्व नेहमीच राहील. आपण आपले काम प्रामाणिकपणे करावे हे आपल्याच हातात असते. जर अवॉर्ड मिळाले तर आनंदच होतो आणि नाही मिळाले तर पुढे आणखी चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो.'

सध्या रवी केवळ वेब सीरीज आणि सिनेमावर लक्ष देत आहे. टेलिव्हीजन वरुन ब्रेक घेतल्यानंतर रवी म्हणतो, 'मी माझे करिअर २००५ मध्ये सुरु केले. मात्र मी ५ वर्षानंतर लोकांच्या नजरेत आलो. १५ वर्ष मी टेलिव्हिजन सोबत जोडलेलो आहे. एखादा प्रोजेक्ट कधी सुरु होतो आणि कधी बंद होतो हे जर आधीच माहिता असेल तर काम करण्याची इच्छा राहते. पण टीव्हीमध्ये असे होत नाही. म्हणूनच मी शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. सध्या एका वेब शो चे शूटिंग पूर्ण करुन लखनउ वरुन मुंबईला येत आहे. लवकरच याबाबत सांगेन.' 
 

Web Title: tv-actor-ravi-dubey-suddenly-gets-trend-on-twitter-is-ravi-getting-an-award