लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 09:18 IST2025-06-16T09:17:12+5:302025-06-16T09:18:11+5:30
राम कपूरने नुकतीच लक्झरियस नवी कोरी कार घरी आणली आहे. अभिनेत्याने लॅम्बोर्गिनी ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. राम कपूरने खरेदी केलेल्या या कारची किंमत कोटींच्या घरात आहे.

लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
अनेक सेलिब्रिटींकडे मर्सिडीज, बीएमडब्लू, लॅम्बोर्गिनी अशा आलिशान आणि महागड्या गाड्या आहेत. या सेलिब्रिटींच्या यादीत आता टीव्ही अभिनेता राम कपूरचंही नाव जोडलं गेलं आहे. राम कपूरने नुकतीच लक्झरियस नवी कोरी कार घरी आणली आहे. अभिनेत्याने लॅम्बोर्गिनी ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. राम कपूरने खरेदी केलेल्या या कारची किंमत कोटींच्या घरात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, राम कपूरने लॅम्बोर्गिनी Urus SE ही कार खरेदी केली आहे. लॅम्बोर्गिनीचं हे व्हर्जन गेल्याच वर्षी म्हणजे २०२४मध्ये भारतात लॉन्च झालं आहे. पत्नी गौतमी कपूरसह राम कपूर ही लॅम्बोर्गिनी खरेदी करण्यासाठी गेला होता. त्याचे फोटो समोर आले आहेत. या लॅम्बोर्गिनी किंमत ४ ते ५ कोटी इतकी आहे. राम कपूरने खरेदी केलेली लॅम्बोर्गिनी ही कारप्रेमींचं आकर्षण आहे. शिवाय यामध्ये कस्टमायझेशन करता येत असल्याने राम कपूरने खास कलर त्याच्या लॅम्बोर्गिनीसाठी सिलेक्ट केला आहे.
राम कपूर हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'कसम से', 'बडे अच्छे लगते है', 'घर एक मंदिर', 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. तर 'मेरे डॅड की मारूती', 'कुछ तो लोचा है', 'बार बार देखो', 'थप्पड', 'गोलमाल रिटर्न्स' अशा बॉलिवूड सिनेमांमध्येही तो झळकला आहे. लवकरच राम कपूर 'लाफ्टर शेफ'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.