‘गोपी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीविरोधात सायबर क्राईमकडे तक्रार, जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 11:27 IST2020-05-26T11:26:55+5:302020-05-26T11:27:06+5:30

सलमान खानचा ‘बिग बॉस 13’ हा शो कधीच संपला. पण या शोमधील स्पर्धक देवोलिना भट्टाचार्जी अद्यापही लाइमलाइटमध्ये आहे. 

tv actor mayur verma filed cybercrime complaint against bigg boss 13 fame devoleena bhattacharjee-ram | ‘गोपी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीविरोधात सायबर क्राईमकडे तक्रार, जाणून घ्या काय आहे कारण

‘गोपी बहू’ देवोलिना भट्टाचार्जीविरोधात सायबर क्राईमकडे तक्रार, जाणून घ्या काय आहे कारण

ठळक मुद्देमयूरने देवोलिनाविरोधात सायबर सेलकडे तक्रार दाखल केली असली तरी देवोलिनाला यामुळे काहीही फरक पडलेला दिसला नाही. हा सगळा पब्लिसिटी स्टंट असल्याचे तिने म्हटले आहे.

सलमान खानचा ‘बिग बॉस 13’ हा शो कधीच संपला. पण या शोमधील स्पर्धक देवोलिना भट्टाचार्जी अद्यापही लाइमलाइटमध्ये आहे.  तूर्तास देवोलिना एका वादात अडकलीय. होय, लॉकडाऊन सुरु असताना ती एका कायदेशीर कारवाईत फसली आहे. ‘मुझसे शादी करोगी’चा स्पर्धक मयूर वर्माने तिच्याविरोधात सायबर क्राईमची तक्रार दाखल केली आहे. देवोलिनाने आपली प्रतिमा खराब केली तसेच अपमानित करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्याने केला आहे.

देवोलिना अलीकडे ‘बिग बॉस 13’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. अर्थात दुखापतीमुळे तिला हा शो मध्येच सोडावा लागला होता. स्टार प्लसवरील ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली होती. टीव्हीवर ती साधी सोज्वळ दिसत असली तरी ख-या आयुष्यात प्रचंड बोल्ड आहे.

काय आहे प्रकरण

‘बिग बॉस 13’चे स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांचे ‘भुला दूंगा’ हे रिलीज झाले आणि यावरून सोशल मीडियावर एक वॉर सुरु झाले होते. ‘बिग बॉस 13’ने या गाण्याची जोरदार खिल्ली उडवली होती. मयूरला हे आवडले नव्हते. त्याने यावरून देवोलिनाला चांगलेच सुनावले होते. यानंतर देवोलिना विरूद्ध मयूर असे नवे वॉर रंगले होते. पुढे दोघांमधील हे भांडण विकोपाला गेले होते आणि आता मयूरने देवोलिनाविरोधात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, या तक्रारीची प्रतही त्याने सोशल मीडियावर शेअर केली. ‘काही गोष्टी मर्यादेबाहेर गेल्या होत्या. त्यामुळे आता मला सायबर क्रामइची मदत घ्यावी लागत आहे. आता सर्व त्यांच्या हातात आहे. मला विश्वास आहे की ते लवकरात लवकरत या प्रकरणावर कारवाई करतील’, असे मयूरने म्हटले आहे.

 देवोलिना म्हणते, पब्लिसिटी स्टंट
मयूरने देवोलिनाविरोधात सायबर सेलकडे तक्रार दाखल केली असली तरी देवोलिनाला यामुळे काहीही फरक पडलेला दिसला नाही. हा सगळा पब्लिसिटी स्टंट असल्याचे तिने म्हटले आहे. इतकेच नाही तर मी कोणत्याही मयूर वर्माला ओळखत नाही. मला माहित नाही तो माझे नाव का घेत आहे. हा एक पब्लिसिटी स्टंट असू शकतो. अशा गोष्टींकडे मी फारशी लक्ष देत नाही. मी या व्यक्तीला ओळखत सुद्धा नाही आणि मला त्याची तक्रार सुद्धा माहित नाही, असे तिने म्हटले आहे.

Web Title: tv actor mayur verma filed cybercrime complaint against bigg boss 13 fame devoleena bhattacharjee-ram