हा टीव्ही अभिनेता स्वतःला समजतो सलमान खान,म्हणून केले असे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 14:51 IST2017-12-07T09:21:37+5:302017-12-07T14:51:37+5:30
नसबंदीच्या (व्हॅसेक्टॉमी) संकल्पनेवर प्रकाश टाकणार्या आगळ्यावेगळ्या कथानकामुळे 'मेरी हानीकारक बिवी' या आगामी मालिकेबद्दल अगोदरच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत आहे.करण सूचकने ...
हा टीव्ही अभिनेता स्वतःला समजतो सलमान खान,म्हणून केले असे काम
न बंदीच्या (व्हॅसेक्टॉमी) संकल्पनेवर प्रकाश टाकणार्या आगळ्यावेगळ्या कथानकामुळे 'मेरी हानीकारक बिवी' या आगामी मालिकेबद्दल अगोदरच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत आहे.करण सूचकने निभावलेल्या अखिलेश पांडे या व्यक्तिरेखेचे आयुष्य आणि त्याचे डॉ.इरासोबतचे (जिया शंकर) नातेसंबंध याभोवती फिरणारे मालिकेचे कथानक आहे.अखिलेशच्या व्यक्तिमत्वातील आगळीवेगळी वैशिष्ट्ये बघता मालिकेच्या टीमने त्याला दिलेला लूक सुपरहिट चित्रपट 'बजरंगी भाईजान'मध्ये सलमान खानने साकारलेल्या व्यक्तिरेखेशी विलक्षण साधर्म्य दाखवणारा आहे.'मेरी हानीकारक बिवी' या मालिकेतील अखिलेश ही व्यक्तिरेखा भगवान हनुमानची परमभक्त आहे.सलमानच्या पवन या व्यक्तिरेखेप्रमाणेच ही व्यक्तिरेखाही अत्यंत दयाळू, लाजाळू, साधी,सरळ आणि प्रामाणिक आहे. अखिलेश या वाराणसीच्या साध्याभोळ्या मुलासाठी त्याच्या आई-वडिलांचा शब्द अखेरचा आहे आणि त्यांच्या आनंदासाठी हा तरुण मुलगा काहीही करण्यास तयार आहे. या सगळ्यावर कडी म्हणजे अखिलेश ही व्यक्तिरेखा सलमान खानने बजरंगी भाईजानमध्ये घातलेल्या लॉकेटसारखेच लॉकेट घालताना दाखवली आहे.याबद्दल विचारले असता अभिनेता करण सूचक म्हणाला, “मला जेव्हा अखिलेश पांडेची भूमिका ऑफर झाली, तेव्हाच माझ्या मनात सलमान खानचा, त्याच्या बजरंगी भाईजानमधील लूक आणि त्याने साकारलेली भूमिकेचा विचार आला.या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये मला अनेक साम्य दिसली.या दोन व्यक्तिरेखांच्या व्यक्तिमत्वातील आणि दृष्टिकोनातील साम्य हे टेलीव्हिजनसाठी या भूमिकेची तयारी करताना पहिल्या पायरीसारखा ठरला. आमच्या व्यक्तिरेखांमधील हे साम्य बघता, मला खात्री वाटते की,प्रेक्षक अखिलेशची व्यक्तिरेखा अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतील. मी या चित्रपटातील सलमानच्या लकबी खूप बारकाईने ध्यानात घेतल्या आहेत.आणि मी त्याची नक्कल करत नाही,तर एक चांगला संदर्भ म्हणून याचा वापर करत आहे”.
करण सुचकने या मालिकेत अखिलेश ही भूमिका साकरतोय तर अखिलेशच्या आईचे पात्र टेलिव्हिजनच्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुचेता खन्ना रंगवणार आहेत. सुचेता खन्ना या मालिकेमध्ये पुष्पा पांडे ही अगदी साचेबद्ध गृहिणी साकारणार आहेत. टीव्हीच्या कामातून दीड ब्रेक घेतला होता. चांगल्या भूमिकेच्या शोधात असणारी सुचेता या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार आहे.