"त्याने मला मागून येऊन पकडलं अन्...", प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 17:41 IST2023-05-15T17:37:31+5:302023-05-15T17:41:52+5:30

मनोरंजन विश्वात कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव अनेक कलाकारांना आला आहे. याबद्दल कोणी उघडपणे बोललं तर कोणी आजही समोर आलेले नाही.

tv actor fahmaan khan shocking revelation on casting couch said he came from behind and caught me | "त्याने मला मागून येऊन पकडलं अन्...", प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव

"त्याने मला मागून येऊन पकडलं अन्...", प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव

मनोरंजन विश्वात कास्टिंग काऊच हा प्रकार काही नवीन नाही. अनेक कलाकारांना कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव अनेक कलाकरांना आला आहे. याबद्दल कोणी उघडपणे बोललं तर कोणी आजही समोर आलेले नाही. इमली मालिकेतून घराघरात पोहोचलेला टीव्ही अभिनेता खानने त्याचा कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला होता.   

फहमान 2014 साली मुंबईत आला जेव्हा त्याची पहिली मालिका मिळाली होती. या शोसाठी 8 महिन्यांचा प्रतीक्षा करावी लागणार होती आणि त्याला 17 लोकांसह 2 बीएचके फ्लॅट शेअर करावा लागला. अभिनेत्याने सांगितले की, 'त्यावेळी साखरही कपाटात बंद करून ठेवावी लागते, अशी परिस्थिती होती.' इतके दिवस वाट पाहिल्यानंतर फहमनला त्याच्या प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले.


अभिनेता म्हणाला,  तो काळ सर्वात निराशाजनक होता. असे वाटायला लागलं होतं की, मी खूप वाईट आहे, लोक मला त्यांच्या शोमध्ये घ्यायला तयार नव्हते. त्यावेळी माझी प्रकृती ठीक नव्हती आणि मी कोणाशीही बोलत नसे. मालिकेसाठी पुन्हा ऑडिशन देण्यास सुरुवात केली त्यानंतर मला आणखी एका मालिकेची ऑफर मिळाली आणि माझे नशीबच बदलले. मला वाटले आता मुख्य भूमिका करावी आणि मी माझे बजेट वाढवले, पण मला टीव्हीचे नियम समजले नाहीत आणि मला काम मिळणे बंद झाले.


फहमन पुढे म्हणाले की, अभिनेत्याने सांगितले की त्याच्या कारकिर्दीत तो अशा लोकांना भेटला ज्यांनी त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्याने सांगितले की तो एका कास्टिंग डायरेक्टरला भेटला जो प्रसिद्ध अभिनेत्यांची नावे घेत होता. अभिनेता म्हणाला, 'त्याला काय हवे आहे ते मला समजले. म्हणून मी त्याला शेवटी विचारले, 'तुला काय हवे आहे ते स्पष्टपणे सांग'. 

फहमन पुढे म्हणाला, 'मी तुमचा आदर करतो पण मी तसा माणूस नाही. मी बाहेर पडायला लागलो आणि मग त्या माणसाने लगेच मागून येऊन मला पकडले. त्याने मला खूप वाईट पद्धतीने मिठी मारली. म्हणून मी तिला ढकलले. तो म्हणाला की, तो पोलिसांना बोलवेल. मी त्याला सांगितले की पोलिसांना इथे यायला 15 मिनिटे लागतील आणि पुढच्या 15 मिनिटांत तू मला पुन्हा स्पर्श केलास तर मी तुझ्या डोक्यावर लाथ मारेन.'
 

Web Title: tv actor fahmaan khan shocking revelation on casting couch said he came from behind and caught me