प्रसिद्ध टीव्ही अभिनेता भूपेंद्र सिंहला अटक, शेतीतील वादातून केली तरुणाची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 09:16 AM2023-12-05T09:16:59+5:302023-12-05T09:35:21+5:30

'मधुबाला : एक इश्क एक जुनून' सारख्या अनेक लोकप्रिय मालिकेत त्याने काम केले आहे.

Tv actor Bhupinder Singh arrested after he did firing at his hometown in which a young boy murdered | प्रसिद्ध टीव्ही अभिनेता भूपेंद्र सिंहला अटक, शेतीतील वादातून केली तरुणाची गोळ्या झाडून हत्या

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता भूपेंद्र सिंहला अटक, शेतीतील वादातून केली तरुणाची गोळ्या झाडून हत्या

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता भूपेंद्र सिंहला (Bhupinder Singh) हत्येच्या आरोपाखाली अटक (Arrest) करण्यात आली आहे. बिजनौरच्या राहणाऱ्या एका तरुणाची भूपेंद्रने गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. झाड तोडण्यावरुन झालेल्या वादात भूपेंद्रने बेछूट फायरिंग केली. यामध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांना गोळी लागली. दरम्यान या फायरिंगमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर इतर लको जखमी आहेत. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपी अभिनेता भूपेंद्र सिंह आणि त्याच्यासोबतच्या आणखी दोन जणांना अटक केली. हत्या झालेल्या तरुणाच्या काकाने भूपेंद्र सिंह आणि चार जणांविरोधात FIR दाखल केली आहे. 

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, भूपेंद्र सिंह १९ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशमधील बिजनौरच्या बढापुर येथील कुआं खेडा या गावी गेला होता. याचठिकाणी ही घटना घडली.  भूपेंद्रची  पत्नी जयपूरमध्ये राहते तर त्यांची मुलं परदेशात शिक्षण घेतात. कुटुंबातील इतर सदस्य गावी राहतात. १५ दिवसांपूर्वी भूपेंद्र गावी गेला होता. दरम्यान शेतातील एका झाडाच्या कापणीवरुन भूपेंद्रचा गावातील गुरदीप या तरुणाशी वाद झाला. दोघंही ते झाड माझंच आहे असं सांगत होते. वाद इतका विकोपाला गेला की भूपेंद्र आणि गुरदीपमध्ये मारामारी झाली. याचवेळी भूपेंद्रने रागात अंधाधुंध गोळीबार केला. यामध्ये गुरदीपच्या २३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

भूपेंद्र सिंहने केलेल्या बेछूट गोळीबारानंतर संपूर्ण गावात खळबळ माजली. घटनास्थळी गुरदीपच्या कुटुंबातील आणखी ४ जण होते ज्यांना गोळी लागली आहे. गावकऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि नंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी भूपेंद्र आणि आणखी चार जणांना अटक केली. गुरदीपने पोलिसांना सांगितले की,भूपेंद्र सिंहची १०० एकरची शेती आहे. गुरदीपची शेती भूपेंद्रच्या शेतीला लागूनच आहे. दोन्हीच्या मध्ये झा आहे ज्यावरुन हा वाद झाला. भूपेंद्र ते झाड माझंच असल्याचं सांगत होता आणि त्याला ते तोडायचे होते. गेल्या महिन्यात १९ तारखेला गुपचूप झाड कापण्यातही आले होते. आता जेव्हा भूपेंद्र रविवारी ३ डिसेंबर रोजी दोन जणांच्या साथीने झाड कापायला आला तेव्हा गुरदीप तिथे पोहोचला. नंतर झालेल्या वादात भूपेंद्रने बंदूक आणली आणि फायरिंग सुरु केली. यामध्ये गुरदीपच्या तरुण मुलाचा मृत्यू झाला. 

भूपेंद्र सिंहने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.'मधूबाला एक इश्क एक जुनून','काला टीका','कार्तिक पूर्णिमा' या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारली आहे.
 

Web Title: Tv actor Bhupinder Singh arrested after he did firing at his hometown in which a young boy murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.