हार्दीक-अक्षया नव्या मालिकेत पुन्हा एकत्र? चाहत्यांना मिळणार मोठं 'सरप्राईज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 12:33 IST2024-10-01T12:33:02+5:302024-10-01T12:33:40+5:30
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं आहे.

हार्दीक-अक्षया नव्या मालिकेत पुन्हा एकत्र? चाहत्यांना मिळणार मोठं 'सरप्राईज'
मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं म्हणून अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) म्हणून ओळखले जाते. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हे दोघेही घराघरात पोहोचले. राणादा आणि पाठक बाई अशी त्यांची ओळख बनली. सेटवरचं प्रेम खऱ्या आयुष्यातही उतरलं आणि २ डिसेंबर २०२२ रोजी अक्षया आणि हार्दिकने सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. ही जोडी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेनंतर आता पुन्हा एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
नुकतंच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी झी मराठी अवॉर्ड्स नॉमिनेशन पार्टीला हजेरी लावली. यावेळी राजश्री मराठीशी बोलताना त्यांनी एकत्र दिसणार असल्याचे संकेत दिले आहेत. पण, नेमकं काय असेल याचा खुलासा त्यांनी केला नाही. अक्षया म्हणाली, "आम्ही आनंदी आहोत की आता पुन्हा झी मराठीसोबत असोसिएशन होतंय. कसं, काय हे सर्व सरप्राईज असणार आहे. पण काहीतरी आहे, जे घेऊन पुन्हा एकदा झी मराठीवर दिसायला आवडेल आम्हाला". तर अक्षयाच्या या विधानावरुन त्यांचा नवीन प्रोजेक्ट येणार असल्याचा अंदाज लावला जातोय.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं आहे. चाहत्यांना त्यांची जोडी फार आवडते. दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात असतात. या दोघांची ऑफस्क्रिन केमेस्ट्रीदेखील भन्नाट आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेनंतर ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. आता दोघे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा ऐकूनच चाहते खूश झाले आहेत.